- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा विजय गांगुर्डे सेवेतून बडतर्फ,२७ कोटींच्या वसूलीचे आदेश, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार येथील प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांना धान्य खरेदीत केलेल्या कोट्यावधी रु.च्या गैरव्यवहार प्रकरणी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांच्यावर सुमारे २७ कोटी रु.ची वसुली लावण्यात आली आहे.असा आदेश महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी दिला आहे.त्यामुळे आदिवासी विकास महामंडळात प्रचंड खळबळ माजली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून आधारभूत धान्यखरेदी करण्यात येते.गांगुर्डे हे जव्हार येथील प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक असताना आधारभूत धान्य खरेदी हंगाम सन २०२२ – २३ अंतर्गत शहापूर येथील उप प्रादेशिक कार्यालयांतर्गत पळशीण…
सुरेश वैद्य,पालघर प्रतिबंधात्मक कारवाई करावी – जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी नुकतेच दिले आहेत. जिल्हास्तरीय बोगस वैद्यकीय व्यवसायिक शोध समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.यावेळी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी,सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ. शशिकांत साळुंके तसेच सर्व तालुका आरोग्य् अधिकारी पोलिस विभागाचे प्रतिनीधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड म्हणाल्या की, समित्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व वैद्यकीय व्यवसायिकांच्या अर्हतांची तपासणी पुर्ण करावी,अशी…
दीपक मोहिते, २०५० साली पाणीटंचाईची बातमी अशी असू शकते, यवतमाळ येथील विहीरीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.पाण्यासाठी परिसरात तणाव कायम आहे… प्रत्येक हापशी पंपावर सुरक्षेसाठी एक पोलीस तैनात करणार..गृहमंत्र्यांची घोषणा, रेशन दुकानावर आता पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करणार..! अन्न व औषधी मंत्र्यांची घोषणा, गोदामावर छापा टाकुन पाच हजार लिटर पाणी केले जप्त….पोलीसांची धडक कार्यवाही, पाण्याअभावी दोघांचा मृत्यू ……समाजमन हळहळले,गावावर शोककळा पसरली, पाण्याचा हंडा हिसकवणारी बाईकर गँग पोलीसांच्या जाळ्यात, रूग्णासाठी खास पाण्याच्या सलाईन उपलब्ध करू……..आरोग्यमंत्री, प्रत्येक तालुक्यात आता पाणी बचत बँक…..अर्थमंत्री, मित्रांनो,हसता हसता कधी डोळ्यातून पाणी आलं ते,कळलं सुद्धा नाही.अशी वेळ आपल्यावर येऊ नये,हीच परमेश्वराकडे प्रार्थना………… पाणी अडवा,पाणी जिरवा,झाडे लावा,झाडे जगवा,
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा, ५० वर्षांपूर्वी म्हणजे २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात आणीबाणी लागू केली.प्रगल्भ लोकशाहीचा पुरस्कार करणारा,मानवी हक्क व अधिकार यास सर्वोच्च प्राधान्य देणारा देश म्हणून जगभरात ओळख असलेल्या भारतात या दिवशी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली.सुमारे २१ महिने आपला देश अंधारात चाचपडत होता.राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचे कारण सांगून इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळाने देशव्यापी आणीबाणीची शिफारस केली.तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांनी संविधानातील कलम ३५२ (१) नुसार देशभरात आणीबाणी जारी केली. पण लोकशाही व्यवस्थेवर दृढविश्वास असणाऱ्या भारतीय जनतेने या आणीबाणीला कडाडून विरोध केला.त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या सरकारने…
जव्हार प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांचे शिष्टमंडळ शासकीय कुटीर रुग्णालयाच्या भेटीवर, जव्हार,मोखाडा आणि विक्रमगड हे आदिवासी बहुल तालुके असून येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय असलेले जव्हार हे एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखण्यात येते. जव्हार येथे असलेले पतंगशहा कुटीर उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यामुळे शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होतो.इमारती,वैद्यकीय उपकरणे,बेड आणि आवश्यक साहित्य यामध्ये बरीच आधुनिक सुधारणा झाली आहे.मात्र,रुग्णालयात अद्याप तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, सर्जन नसणे,शस्त्रक्रिया न होणे,अतिदक्षता विभागाची अनुपलब्धता,तसेच डिजिटल एक्स-रे,एमआरआय यांसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. फिजिओथेरेपी उपकरणे असूनही त्याचा योग्य पद्धतीने वापर होत नाही. या भागातील आदिवासी रुग्ण दूरवर असलेल्या डोंगरदऱ्यांतून हे रुग्णालय गाठत असतात.मात्र,गंभीर आजाराच्या रुग्णांना वापी, सेल्वासा,नाशिकसारख्या शहरांमध्ये हलवावे लागते. तालुक्याच्या…
वसंत भोईर,वाडा चिंचघर – वाडा येथे इनोव्हेटर्स फसाड कंपनीचे बेसुमार अनधिकृत बांधकाम, वाडा तालुक्यातील चिंचघर गावातील मे.इनोव्हेटर्स फसाड कंपनीने नियम धाब्यावर बसवून हजारो चौरस मीटरचे अनधिकृत बांधकाम केले आहे.या अनधिकृत बांधकामाला ग्रामपंचायतीने कंपनीला नोटिस बजावली आहे.मात्र कंपनीने या नोटीसीला केराची टोपली दाखवली असून, ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा कर थकवला आहे.कंपनीच्या या अनधिकृत बांधकामावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे केली आहे. तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात इनोव्हेटर्स फसाड ही इमारत बांधकाम साहित्य बनवणारी कंपनी कार्यरत आहे.कंपनीने आपल्या मालकीच्या भूखंड क्रमांक ४२९, ४०४/२ब ४०३/१ या जमिनीवर बांधकाम करताना जमीन महसूल संहिता कायदे, नगररचना कायदे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम यांचे उल्लंघन केले…
सचिन परब,विरार विरार येथे सौर ऊर्जा जनजागृती अभियान – २०२५ संपन्न, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र, माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ” करिअर कट्टा,” या उपक्रमा अंतर्गत सोलर सोसायटी ऑफ इंडिया आणि विरार येथील विवा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सौर ऊर्जा जनजागृती अभियान २०२५ हा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम २१ जून २०२५ रोजी विरार येथील विवा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.हा उपक्रम महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांमध्ये राबवण्यात येणार असून या उपक्रमांतर्गत ५५ हजार ५५५ तरुणांना प्रशिक्षण व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या दोन दिवसीय उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे,डॉ.…
संजय नेवे,विक्रमगड विक्रमगड तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक रस्ते बंद, विक्रमगड तालुक्यात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन पार विस्कळीत झाले आहे.ग्रामीण भागातील विविध पुलावरून पाणी गेल्यामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. विक्रमगड तहसीलदार यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यातील शीळ-देहर्जे रोडवरील देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच सारशी- शोळशेत रोडवरील सारशी येथील ओहोळावरील मोरी पुल पाण्याखाली गेला तर कुरंझे-कंचाड रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे. तर वेहेलपाडा कासपाडा कडे जाणारा रस्ता ही पाण्याखाली गेला असुन वाहतूक बंद करण्यात आली आहे.परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विक्रमगड तालुक्यात सकाळपासून मुसळधार…
जव्हार प्रतिनिधी, शिरोशी कातकरीपाडा पूल पाण्याखाली,ग्रामस्थाना ५ कि.मी.चा फेरा, जव्हार तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शिरोशी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या कातकरी पाड्याचा मुख्य मार्गावरील मोरी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे या पाड्याचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटला आहे.नागरिक,शेतकरी, विद्यार्थी आणि आजारी व्यक्ती यांना अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. या पाड्याला कळमविहिर मार्गे पर्यायी रस्ता उपलब्ध असला तरी,त्या मार्गाने नागरिकांना ५ कि.मी.चा अतिरिक्त फेरा मारून जावे लागत आहे,जो आबालवृद्ध,लहान मुले, महिलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत आहे.पावसाळ्यात वाहतूक साधनांचा असलेला अभाव, यामुळे पर्यायी मार्गही अनेकदा असुरक्षित ठरतो. दरवर्षी पावसाळ्यात ही मोरी पाण्याखाली जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही स्थानिक…
वसंत भोईर,वाडा मानीचा पाडा गेल्या तीन दिवसापासून नॉट रिचेबल, तालुक्यातील गो-हे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मानीचा पाडा गावातील पूल गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे.येथील गांवपाडा व कातकरी वाडी अशा दोन गावातील ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय झाली आहे. गो-हे ग्रामपंचायत हद्दीतील मानीचा पाडा हे गाव ३० घरांचे तर कातकरी वाडी पंधरा-वीस घरांची आहे.दोन्हीही गावे शंभर टक्के आदिवासी लोक वस्ती असलेली गावे आहेत.या गावातील नागरिकांसाठी येय-जा करण्यासाठी असलेले छोटे पूल गेल्या तीन दिवसापासून पाण्याखाली गेल्याने या गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. या गावातील विद्यार्थी गो-हे येथे शाळेत जात असतात. या विद्यार्थ्यांची तीन दिवसापासून शाळा बंद असल्यामुळे…
