सचिन परब,विरार
विरार येथे सौर ऊर्जा जनजागृती अभियान – २०२५ संपन्न,
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र, माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ” करिअर कट्टा,” या उपक्रमा अंतर्गत सोलर सोसायटी ऑफ इंडिया आणि विरार येथील विवा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सौर ऊर्जा जनजागृती अभियान २०२५ हा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम २१ जून २०२५ रोजी विरार येथील विवा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.हा उपक्रम महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांमध्ये राबवण्यात येणार असून या उपक्रमांतर्गत ५५ हजार ५५५ तरुणांना प्रशिक्षण व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या दोन दिवसीय उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे,डॉ. एस.एस.खरात ( प्राचार्य, मॉडर्न कॉलेज गणेशखिंड, पुणे ) ,विवा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.दीपा वर्मा , उपप्राचार्या डॉ.प्राजक्ता परांजपे,अन्य मान्यवर उपस्थित होते.
सौर ऊर्जा ही भविष्यातील ऊर्जा क्रांतीचे माध्यम आहे. इंधनाच्या खर्चात बचत, पर्यावरण संवर्धन विकासात तिची भूमिका अत्यंत मोलाची आहे.
सौर ऊर्जा ही जनजागृती करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे.सदर विषयाला अनुसरून काही मिनिटांचा व्हिडिओ सर्व सहभागी उपस्थितांना करिअर कट्टा अँप lमधून उपलब्ध करण्यात येणार आहे.या माहितीच्या आधारे, व्हिडिओतील सौर ऊर्जा आणि त्याची उपयुक्तता,या माहितीच्या आधारावर काही प्रश्न विचारण्यात आले.या उपक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या उपक्रमात सहभागी महाविद्यालय यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होऊन पर्यावरण संरक्षण व्हावे,असा हेतू मनाशी बाळगून या उप्रकमाची आखणी करण्यात आली आहे.
करिअर कट्टा समितीचे सर्व सदस्य,करिअर संसदेचे विद्यार्थी,महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांनी या दोन दिवसीय सौरऊर्जा जनजागृतीपर आयोजित उपक्रमाचे यशस्वीरीत्या नियोजन केले.

