दीपक मोहिते,
२०५० साली पाणीटंचाईची बातमी अशी असू शकते,
यवतमाळ येथील विहीरीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.पाण्यासाठी परिसरात तणाव कायम आहे…
प्रत्येक हापशी पंपावर सुरक्षेसाठी एक पोलीस तैनात करणार..गृहमंत्र्यांची घोषणा,
रेशन दुकानावर आता पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करणार..!
अन्न व औषधी मंत्र्यांची घोषणा,
गोदामावर छापा टाकुन पाच हजार लिटर पाणी केले जप्त….पोलीसांची धडक कार्यवाही,
पाण्याअभावी दोघांचा मृत्यू ……समाजमन हळहळले,गावावर शोककळा पसरली,
पाण्याचा हंडा हिसकवणारी बाईकर गँग पोलीसांच्या जाळ्यात,
रूग्णासाठी खास पाण्याच्या सलाईन उपलब्ध करू……..आरोग्यमंत्री,
प्रत्येक तालुक्यात आता पाणी बचत बँक…..अर्थमंत्री,
मित्रांनो,हसता हसता कधी डोळ्यातून पाणी आलं ते,कळलं सुद्धा नाही.अशी वेळ आपल्यावर येऊ नये,हीच परमेश्वराकडे प्रार्थना…………
पाणी अडवा,पाणी जिरवा,झाडे लावा,झाडे जगवा,

