संजय नेवे,विक्रमगड
विक्रमगड तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक रस्ते बंद,
विक्रमगड तालुक्यात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन पार विस्कळीत झाले आहे.ग्रामीण भागातील विविध पुलावरून पाणी गेल्यामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत.
विक्रमगड तहसीलदार यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यातील
शीळ-देहर्जे रोडवरील देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
तसेच सारशी- शोळशेत रोडवरील सारशी येथील ओहोळावरील मोरी पुल पाण्याखाली गेला तर
कुरंझे-कंचाड रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे.
तर वेहेलपाडा कासपाडा कडे जाणारा रस्ता ही पाण्याखाली गेला असुन वाहतूक बंद करण्यात आली आहे.परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विक्रमगड तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे,त्यामुळे बरेच पूल पाण्याखाली गेल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत.नागरिकांनी सतर्क रहावे व आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे,तसेच काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तहसील कर्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

