Author: दीपक मोहिते

नालासोपारा येथे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि श्रद्धांजली, काश्मीरमधील पहलगाम येथे काल झालेल्या दहशतवादी हल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली.याप्रसंगी शेकडो नागरिकांनी भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी लोकसभा संघटक पंकज देशमुख,जिल्हाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर,उप जिल्हा संघटक भारती गावडे, विधानसभा संघटक राज सिंग, प्रणब खामकर,शहर शहर संघटक पवित्रा चंदा,युवा सेनेचे रोहन चव्हाण,प्रतीक जाधव,ऍड.रोहन पाठारे अनेक शाखाप्रमुख,विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.या निदर्शनात पाकिस्तानच्या विरोधात निदर्शकांनी जोरदार घोषणा दिल्या व दहशतवाद्याना योग्य धडा शिकवण्याची मागणी करण्यात आली.

Read More

वसंत भोईर,वाडा वाड्यात महाविकास आघाडीतर्फे संतप्त निदर्शने, पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ निरपराध पर्यटकांवर दहशतवाद्यानी हल्ला करून ठार मारले.या घटनेचे देशभरात त्याचे पडसाद उमटले. या घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांनी आपला जीव गमवला असून या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे वाडा शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी निदर्शकांनी पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची मागणी केली. या निषेध आंदोलनात काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील,तालुकाध्यक्ष दिलीप पाटील,शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे,तालुकाप्रमुख निलेश पाटील,वाडा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष गितांजली कोळेकर,भरत गायकवाड,जनार्दन भेरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, गणेश पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी…

Read More

सुरेश वैद्य,पालघर मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न, आगामी मान्सून काळात संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी आवश्यक ती तयारी सुरू असून आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.मान्सूनपूर्व आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे करण्यात आले यावेळी पालकमंत्री नाईक बोलत होते. या बैठकीस खा.डॉ.हेमंत सावरा,आ.स्नेहा दुबे,आ.राजन नाईक,आ.हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर, खत्री,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिका, आरोग्य, जलसंपदा,सार्वजनिक बांधकाम,महावितरण तसेच रेल्वे,पोलीस व इतर संबंधित यंत्रणांचे…

Read More

दीपक मोहिते, ग्राउंड रिपोर्ट, पहलगाम दहशतवादी हल्ला ; जगभरात निषेधाचा सूर, काश्मीरच्या पहलगाम या निसर्गरम्य परिसरात दहशतवाद्यानी अंधाधुंद गोळीबार करत सुमारे २६ पर्यटकांची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यातील चार तरुण हे ” द रेसिस्टंन्ट्स फ्रंट ( टीआरएफ ) या दहशतवादी संघटनेचे अतिरेकी आहेत.काश्मीर खोऱ्यात गेल्या चार दशकापासून पाक पुरस्कृत हा दहशतवाद असुन त्यामध्ये ५ प्रमुख कट्टरतावादी संघटना सहभागी आहेत. १९९० च्या दशकात काश्मीरमध्ये पाकिस्तानने दहशतवाद्यांची घुसखोरी आणि कट्टरतावाद याला खतपाणी घालण्यास सुरुवात केली.सर्वप्रथम या दहशतवाद्यानी काश्मीरमधून हुसकावून लावण्याचे तंत्र अवलंबले. त्यानंतर काश्मिरी पंडितांचं पलायन सुरू झाले.काश्मिरामधील कट्टरतावाद्यांनी पुढची अनेक वर्षं भारत सरकारविरुद्ध आणि सुरक्षा यंत्रणांविरुद्ध सशस्त्र कारवाया सुरू ठेवल्या. बॉम्बहल्ले,अपहरण,…

Read More

प्रतिनिधी जव्हार, जव्हार येथे ” जागतिक पुस्तक दिन,” मोठ्या उत्साहात साजरा, आज जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा काळीधोंड येथे ” वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनसंस्कार रुजावेत व ज्ञानात भर पडावी,असा उद्देश बाळगून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध वाचनप्रेरक उपक्रम राबवण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक भाऊसाहेब शेटे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. त्यांनी गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांच्याकडून प्रेरणा घेत कार्यक्रम राबवला. यामध्ये विद्यार्थ्यांना पेपर,गोष्टी वाचन,कथाकथन, विज्ञानविषयक अशा विविध स्वरूपाचे वाचन प्रकार करून घेण्यात आले.तसेच,जागतिक स्तरावर विविध प्रांतांची भाषिक समज विकसित व्हावी याकरिता हिंदी,इंग्रजी,…

Read More

अनंत भोईर,पालघर पालघर येथे ” पोषण पखवाडा २०२५,” चा सांगता समारंभ उत्साहात संपन्न, “ सुपोषित बालक – तेजस्वी भारत,” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद पालघर अंतर्गत राबवण्यात आलेल्या “पोषण पखवाडा २०२५,” या जनजागृती मोहिमेचा तालुका स्तरीय सांगता कार्यक्रम आज पालघर येथे भव्य उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे प्रवीण मधुकर भावसार ( जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद पालघर व प्रकल्प अधिकारी,पालघर नागरी ) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी प्रमुख सेविका भोये,पालघर बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका,स्थानीय पालक वर्ग, तसेच बालके सहभागी झाले होते. ८ ते २२ एप्रिल २०२५ दरम्यान पालघर तालुक्यातील विविध अंगणवाड्यांमध्ये पोषणविषयक…

Read More

सुरेश वैद्य,पालघर जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शिरगाव समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम, जागतिक वसुंधरा दिनानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) अंतर्गत आज सायंकाळी शिरगाव समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक कचऱ्याचे संकलन व जनजागृती करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रूपाली सातपुते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन) ऐजाज शेख,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रशेखर जगताप,महिला व बालकल्याण अधिकारी प्रवीण भावसार,स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष चौधरी, वित्त व लेखा अधिकारी धनराज पांडे,कृषी अधिकारी पिंजारी,जिल्हा…

Read More

प्रतिनिधी जव्हार, आदिवासी तरुण डॉ.अजय डोके यांचा युपीएससी परीक्षेत नेत्रदीपक यश, पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील दुर्गम कोगदा गावात राहणाऱ्या डॉ. अजय कांशीराम डोके या २७ वर्षीय युवकाने UPSC २०२४ परीक्षेत अव्वल नंबर पटकावत संपूर्ण जव्हार तालुक्याचा व पालघर जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.ते जव्हार तालुक्यातील युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले आदिवासी तरुण ठरले आहेत. डॉ.अजय डोके यांचे बालपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले असून,त्यांचे प्राथमिक शिक्षण १ ली ते ४ थी कोगदा गावातच झाले.त्यानंतर त्यांनी ५ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण इंग्लिश मिडीयम स्कुल ब्रम्हावॅली,त्र्यंबकेश्वर येथे पूर्ण केले.अभ्यासातील सातत्य व चिकाटीमुळे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातही यश मिळवले. त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण मुंबईतील…

Read More

दीपक मोहिते, मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा ; राज्य सरकारचे ऐतिहासिक पाऊल, काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय,एक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे.गेल्या अनेक दशकापासून मच्छीमार मागणी करत होते,ती आता पूर्ण झाली असून याचा लाभ राज्यातील सुमारे ४ लाख ८३ हजार मच्छीमाराना होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मच्छीमाराना आता कृषिक्षेत्राप्रमाणे विविध सवलती मिळणार आहेत.त्यामध्ये विमा, आर्थिक सहाय्य व नुकसानभरपाई याचा समावेश आहे.या सवलतीमुळे मत्स्यव्यवसायला सुगीचे दिवस येतील व उत्पादन वाढीस चालना मिळेल.तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील बळकटी येणार आहे.या निर्णयामुळे मच्छीमाराना वीज शुल्कात अनुदान मिळेल,त्यांना किसान क्रेडिट कार्ड,कृषी दराने कर्ज,अल्पदराने विमा संरक्षणाचा लाभ,उपकरणे सवलतीच्या दराने उपलब्ध होतील.यापूर्वी मत्स्य…

Read More

दीपक मोहिते, बॉटम लाईन, पहलगाम दहशतवादी हल्ला ; २७ पर्यटक मृत्यूमुखी, पहलगामचा दहशतवादी हल्ला,हा जम्मू-काश्मीर अद्याप धगधगतच असल्याचे स्पष्ट झाले आहे.तेथे गेलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकाने नेमकं काय घडलं,ते सविस्तर सांगितले असुन या दहशतवादी हल्ल्यात २७ निष्पाप पर्यटक मृत्यूमुखी पडले आहेत.तर अन्य बारा जण जख्मी झाले आहेत.हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री तातडीने जम्मु – काश्मीरला रवाना झाले आहेत.तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन चर्चा केली. जम्मू-काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.यात काही महाराष्ट्राच्या नागरिकांचाही समावेश आहे. पहलगामचा दहशतवादी हल्ला नेमका कसा झाला ? याविषयी तेथे गेलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकाने सविस्तरपणे सांगितलं आहे.जम्मू-काश्मीरमधील या हल्ल्यानंतर…

Read More