वसंत भोईर,वाडा
वाड्यात महाविकास आघाडीतर्फे संतप्त निदर्शने,
पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्या
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ निरपराध पर्यटकांवर दहशतवाद्यानी हल्ला करून ठार मारले.या घटनेचे देशभरात त्याचे पडसाद उमटले.
या घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांनी आपला जीव गमवला असून या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे वाडा शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी निदर्शकांनी पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची मागणी केली.
या निषेध आंदोलनात काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील,तालुकाध्यक्ष दिलीप पाटील,शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे,तालुकाप्रमुख निलेश पाटील,वाडा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष गितांजली कोळेकर,भरत गायकवाड,जनार्दन भेरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, गणेश पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या हल्ल्याचा बदला घ्या,अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली.
Trending
- सक्रिय नसलेल्या राजकीय पक्षाना हजारो कोटी रु. च्या देणग्या,
- दादांच्या जाण्यावर कोणी राजकारण करू नये – सुनेत्राताई पवार,
- वाढवण बंदर ; तिढा अधिक जटील होत चालला आहे,
- ग्रामीण भागातील खेडी समृद्ध होण्यासाठी शाश्वत विकासाची गरज,
- विरोधी पक्षाकडून ७.८ टक्के जीडीपी वाढीच्या आकडेवारीवर संशय व्यक्त,
- वसईत स्मार्ट मीटर विरोधात ७ सप्टें. रोजी सर्वपक्षीय आंदोलन,
- पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक प्रक्रिया वेगात सुरु,
- पालघर जिल्हा प्रशासन व वयम यांच्यात सामंजस्य करार,

