नालासोपारा येथे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि श्रद्धांजली,
काश्मीरमधील पहलगाम येथे काल झालेल्या दहशतवादी हल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली.याप्रसंगी शेकडो नागरिकांनी भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी लोकसभा संघटक पंकज देशमुख,जिल्हाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर,उप जिल्हा संघटक भारती गावडे, विधानसभा संघटक राज सिंग, प्रणब खामकर,शहर शहर संघटक पवित्रा चंदा,युवा सेनेचे रोहन चव्हाण,प्रतीक जाधव,ऍड.रोहन पाठारे अनेक शाखाप्रमुख,विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.या निदर्शनात पाकिस्तानच्या विरोधात निदर्शकांनी जोरदार घोषणा दिल्या व दहशतवाद्याना योग्य धडा शिकवण्याची मागणी करण्यात आली.

