प्रतिनिधी जव्हार,
जव्हार येथे ” जागतिक पुस्तक दिन,” मोठ्या उत्साहात साजरा,
आज जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा काळीधोंड येथे ” वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनसंस्कार रुजावेत व ज्ञानात भर पडावी,असा उद्देश बाळगून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध वाचनप्रेरक उपक्रम राबवण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक भाऊसाहेब शेटे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. त्यांनी गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांच्याकडून प्रेरणा घेत कार्यक्रम राबवला. यामध्ये विद्यार्थ्यांना पेपर,गोष्टी वाचन,कथाकथन, विज्ञानविषयक अशा विविध स्वरूपाचे वाचन प्रकार करून घेण्यात आले.तसेच,जागतिक स्तरावर विविध प्रांतांची भाषिक समज विकसित व्हावी याकरिता हिंदी,इंग्रजी, मराठीसह इतर भाषांमधील पुस्तके विद्यार्थ्यांना वाचण्यास देण्यात आली.वर्गशिक्षकांनी आपापल्या वर्गाचा अध्ययन स्तर निश्चित करून त्यानुसार वाचनाची तयारी करून घेतली.या उपक्रमात सहशिक्षिका लक्ष्मी ठाकरे, संजय कोकतरेनरसिंग सूर्यवंशी,अर्जुन शिंदे,सुनिता इंगळे व कुवरा यांचे मोलाचे योगदान लाभले.कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य,पालक,सरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक,डॉक्टर आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले व अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे मत व्यक्त केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढून त्यांना ज्ञानार्जनाची नवी दिशा मिळाली आहे.शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे या यशस्वी आयोजनाबद्दल पालकांनी अभिनंदन करण्यात आले.

