Author: दीपक मोहिते

वसंत भोईर,वाडा सरपंच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात,ग्रामसेवकांनी ठोकली धूम, तालुक्यातील सापरोंडे -मागाठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा गवारी यांना ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी १९ हजारांची लाच घेताना ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना नुकतीच घडली होती. त्याची माहिती या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक किरण हरड यांना कळल्यानंतर आपली पण या प्रकरणी चौकशी होईल,या भीतीने ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावून ते पसार झाल्याच्या चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे. ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरणाचे काम पूर्ण होत असल्याने ठेकेदार या ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे बिल काढण्यासाठी वारंवार हेलपाटे मारूनही केलेल्या कामाचे बिल मिळत नव्हते.संबंधित कामाचे बिल अदा करण्याची जबाबदारी सरपंचासह प्रशासकीय अधिकारी…

Read More

संदीप जाधव,बोईसर सूर्या नदीसाठी जनआक्रोश ; पांजरेत करमतारा कंपनीविरोधात जोरदार एल्गार, बोईसर पूर्व परिसरात सूर्या नदीचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी आणि बोईसर, तारापूर वसई-विरार परिसरातील जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी स्थानिक नागरिकांनी करमतारा कंपनीच्या विरोधात पांजरे येथे सभेचे आयोजन केले होते. रविवारी दुपारी अकराच्या सुमारास हे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विविध सामाजिक संघटनांचे नेते आणि नागरिकांनी नव्याने होवू घातलेल्या करमतारा कंपनीला या परिसरात पाय रोवू देणार नाही,असा निर्धार व्यक्त केला. उलगुलान ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंगाडा,मनसेचे पालघर जिल्हा अध्यक्ष भावेश चुरी,भूमी सेनेच्या नेत्या नीता काटकर,आदिवासी एकता परिषदे नेते दत्ता करबट, सामाजिक कार्यकर्ते रमेश डोंगरे,वैभव पाटील,कुणबी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,संजय पाटील,रोहन पाटील,लोकशाहीर…

Read More

दीपक मोहिते, सीमेवरील वास्तव, जल सिंधू करार ; अंमलबजावणी होणे कठीणच, आम्ही चीनची मदत घेऊ,पाकची दर्पोक्ती, सिंधू जल कराराला भारतानं स्थगिती दिली आहे.तसे पत्र पाकिस्तानला पाठवण्यात आले आहे.पाकिस्तानवर सीमापार दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप करत भारतानं पाकिस्तान विरोधात उचललेलं महत्वाचे पाऊल असल्याचे मानण्यात येत आहे.पण आपल्या या निर्णयाची अंमलबजावणी होणे अशक्य आहे. पाकिस्तानने नेहमीप्रमाणे ” या हल्ल्याशी आमचा कोणताही संबंध नाही,” असे सांगत पाकिस्तानने भारताचे सारे आरोप फेटाळले आहेत.दुसरीकडे त्यांचे मंत्री तर युद्ध करण्याची धमकी देत सुटले आहेत.पाकिस्ताननेही आता भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी पावलं उचलली आहेत.पाकिस्ताननं म्हटलं आहे की,” पाणी रोखणे ” हे युद्धाला आमंत्रण देण्यासारखे आहे.” त्यामुळे भारताने असा आतताईपणा…

Read More

मनिष धानू,डहाणू डहाणू जनता को-ऑप.बँकेत डहाणू विकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी, डहाणू जनता को-ऑप. बँकेच्या निवडणूकित डहाणू विकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले.या निवडणुकीत प्रगती पॅनलचा दारुण पराभव झाला.त्यांचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही.या प्रगती पॅनलने प्रचारात डहाणू विकास आघाडीवर विविध आरोप केले होते.पण डहाणूवासियांनी त्याकडे दुर्लक्ष करत डहाणू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या पारड्यात भरघोस मते टाकली. या निवडणुकीत प्रगती पॅनलने हवा निर्माण केली होती.पण त्यांना सर्वच्या सर्व जागा लढवता आल्या नाहीत.त्यामुळे डहाणू विकास आघाडीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित १३ जागासाठी २२ उमेदवार रिंगणात होते.एकूण ७ हजार ५२७ मतदारांपैकी ४ हजार २१ मतदारांनी मतदान…

Read More

नाशिक प्रतिनिधी, नाशिक महानगरपालिकेतर्फे ” वसुंधरा सप्ताह स्वच्छता मोहीम,” नाशिक महानगरपालिकेने जागतिक ” माझी वसुंधरा सप्ताह,” साजरा करताना ” वसुंधरा वाचवा,वसुंधरा सजवा,” या उपक्रमांची सुरुवात करण्यात आली.” या उपक्रमांतर्गत ” माझी नंदिनी,माझी जबाबदारी,” ही विशेष नदी स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली. महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी महानगरपालिका नदी संवर्धनासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.त्यांनी नागरिकांना देखील नदी स्वच्छतेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. ” नदी आपली जीवनदायिनी आहे.तिचे रक्षण करणे आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले. या मोहिमेमध्ये ” ईलाइट क्लब ऑफ नाशिक,” ही सामाजिक संस्था सहभागी झाली होती. महानगरपालिका शिक्षण विभाग व स्वच्छता विभाग यांच्या सहकार्याने १०० हून अधिक…

Read More

सुरेश काटे,तलासरी अणवीर गावात प्लास्टिक बंदी जनजागृती आणि स्वच्छता अभियान, यशराज रिसर्च फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि ग्रुप ग्रामपंचायत अणवीर-सावरोली यांच्या सहकार्याने “ पर्यावरण बचाव वसुंधरा सजाव,” हे स्वच्छता अभियान अणवीर गावात राबवण्यात आले.या अभियाना दरम्यान रस्त्याच्या आजू बाजूचा भाग,आरोग्य केंद्र, शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी साचलेले प्लास्टिक व इतर कचरा उचलण्यात येवून गावाची स्वच्छता करण्यात आली.तसेच गावात रॅली काढून पर्यावरण विषयी संदेश देण्यात आले.याअभियानात गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका,शाळांमधील शिक्षक,विद्यार्थी,यशराज रिसर्च फाउंडेशन टीमचे सदस्य यांनी उत्साहाने सहभागी झाले होते.या उपक्रमाचे नियोजन यशराज रिसर्च फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक संतोष काठोळे आणि त्यांच्या टीमने केले. पर्यावरणाची होणारी हानी थांबवून त्याचे संवर्धन करणे, ही आपली सर्वांची…

Read More

संजय नेवे,विक्रमगड भाजपचे आजपासून दोन दिवस गाव/वस्ती संपर्क अभियान, विक्रमगड मंडळ अध्यक्ष रवींद्र भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासुन दोन दिवस विक्रमगड नगरपंचायत हद्दीतील शाळांना भेटी देणे व या भेटीदरम्यान शाळेमधील विद्यार्थ्यांशी शिक्षकांशी संवाद साधणे, अशा अभियानाला सुरुवात झाली. यावेळी ” गाव वस्ती संपर्क अभियान,” प्रवासी नेते जिल्हास्तरीय कैलाश सहारे तसेच माजी सभापती तथा तालुका सरचिटणीस जिजाताई टोपले,अरुणदादा मोरघा,बूथ प्रमुख संजीवनी ताई माडी व ” गाव/वस्ती संपर्क अभियान,” नगरपंचायत प्रमुख राहुल मोरे यांच्या उपस्थितीत गाव वस्ती अभियान करून विविध गावपाड्यांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधण्यात आला.तसेच शाळा अंगणवाड्या यांनाही भेटी देऊन त्यांची पाहणी केली तसेच जुने भाजपचे कार्यकर्त्यांची भेटीगाठी यावेळी घेण्यात आल्या.या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आम्हाला देशाची सुरक्षितता नाही, तर निवडणुका महत्वाच्या… पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी लगबगीने दिल्लीत परतले.दिल्लीत यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन घडलेल्या घटनेचा त्यांनी आढावा घेतला.दरम्यान देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते व त्यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली.या दौऱ्यात अमित शहा यांनी मदतकार्या विषयी आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात आल्या,आल्या अनेक सिंहगर्जना केल्या. ” किसीको छोडा नही जायेगा, हरेक को अपने किये कि सजा मिलेगी,” अशा त्या गर्जना होत्या.त्या ऐकल्यानंतर आम्हा भारतीयांचा ऊर भरून आला. त्यांच्या ५६ इंची छातीला न्याय देत मोदी जम्मू – काश्मीरच्या…

Read More

सुरेश वैद्य,पालघर शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल,असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा शुभारंभ पालघर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला,त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा.डॉ.हेमंत सवरा,आ.सर्वश्री राजेंद्र गावित,निरंजन डावखरे, माजी आ.राजेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी ,संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जी.के थोरात,कार्याध्यक्ष नरसु पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पहेलगाम येथे पर्यटकावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेचीअत्यंत गंभीर दखल घेतली असून अतिरेक्यावर अशा पद्धतीने कारवाई करण्यात…

Read More

वसंत भोईर,वाडा कुडूसमध्ये रंगला कबड्डीचा थरार, धिरज निलेश सांबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिजाऊ संघटनेतर्फे कुडूस ता. वाडा येथे जिल्हास्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धा आज पार पडल्या.या स्पर्धेत साईकृपा वसरे पालघर संघाने विजेतेपद पटकावले. लवकुश बोईसर व जीवनज्योती हालोली संघ हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तर चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो जय हनुमान दिनकरपाडा संघ वाडा.या स्पर्धेचा मालिकावीर ठरला लवकुश संघाचा राघवेंदरसिंग तर सर्वोत्कृष्ट पकडीचा मान वसरे संघाचा फैजल खान तर हालोली संघाचा हुकमी एक्का ध्रुव डोंगरे यांना मिळाला.सर्वोत्कृष्ट रेडर महिला संघातून प्रथम क्रमांकाचा मान मिळवला समर्थ क्रीडा महिला संघ वाडा यांनी तर द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला जे.वाय.पाटील…

Read More