वसंत भोईर,वाडा
कुडूसमध्ये रंगला कबड्डीचा थरार,
धिरज निलेश सांबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिजाऊ संघटनेतर्फे कुडूस ता. वाडा येथे जिल्हास्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धा आज पार पडल्या.या स्पर्धेत साईकृपा वसरे पालघर संघाने विजेतेपद पटकावले.
लवकुश बोईसर व जीवनज्योती हालोली संघ हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
तर चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो जय हनुमान दिनकरपाडा संघ वाडा.या स्पर्धेचा मालिकावीर ठरला लवकुश संघाचा राघवेंदरसिंग तर सर्वोत्कृष्ट पकडीचा मान वसरे संघाचा फैजल खान तर हालोली संघाचा हुकमी एक्का ध्रुव डोंगरे यांना मिळाला.सर्वोत्कृष्ट रेडर महिला संघातून प्रथम क्रमांकाचा मान मिळवला समर्थ क्रीडा महिला संघ वाडा यांनी तर द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला जे.वाय.पाटील कबड्डी महिला संघ बिलावली,या संघाला.. स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी जिजाऊ संस्था संस्थापक निलेशजी सांबरे,जिल्हा प. पालघर बांधकाम आरोग्य सभापती संदेश ढोणे,कामगार नेते महेंद्र ठाकरे डॉ.गिरीश चौधरी शशिकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे धनंजय चौधरी,दिनेश पांडे, शिवसेनेचे भावेश पष्टे युवा उद्योजक प्रज्वल पाटील व धिरज निलेश सांबरे,इ. मान्यवर उपस्थित होते.
जिजाऊ संघटना महाराष्ट्र सदस्य अश्विन सांबरे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू अरविंद देशमुख यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले.
उपसरपंच आर्या देशमुख, तन्वी पानवे,आदिती भागवत,अमोल सातपुते, अदनान शेख, रितेश दिनकर,मयुर चौधरी,केतन पाटील,अभिषेक वीर,आदर्श पाटील यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

