- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा वाडा सहकारी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी विकास पातकर यांची निवड, वाडा शहरातील वाडा सहकारी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी विकास पातकर तर सचिवपदी प्रमोद भोईर, उपाध्यक्ष अॅड मनोज पष्टे, स्कूल कमिटी चेअरमन ( पा.जा. हायस्कूल वाडा ) दिलीप पाटील,को.ऑर्डीनेशन स्कूल कमिटी चेअरमन ( सरस्वती विद्या मंदिर कंचाड ) हरिभाऊ पाटील,सहसचिवपदी विकास जाधव आदी पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी सभेमध्ये काल निवड करण्यात आली. वाडा तालुक्यातील नावाजलेल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची काल बैठक पार पडली.या बैठकीत संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.गेल्या पंचवीस वर्षापासून या संस्थेचा अनागोंदी कारभार सुरू होता. त्यापासून संस्थेची मुक्तता करून शाळेची शैक्षणिक प्रगती व स्वच्छ पारदर्शक काम करण्यासाठी ही कमिटी बांधील असल्याचे नवनिर्वाचित…
वसंत भोईर,वाडा सेवानिवृत्त जवान नंदन जाधव यांचा सन्मान, वाडा तालुक्यातील चांबळे येथील सैन्यदलातील जवान नंदन रघुनाथ जाधव हे भारतीय सैन्य दलात २० वर्षे सेवा करून नुकतेच निवृत्त झाले.त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने कृतज्ञता सन्मान सोहळा करण्यात आला. नंदन जाधव हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून ते जून २००५ साली सेवेत रुजू झाले होते.हैद्राबाद येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पठाणकोट ( पंजाब ) येथे झाली.त्यानंतर ते सलग आठ वर्षे जम्मु काश्मीर येथे कर्तव्यावर होते.त्यानंतर सात वर्षे संभाजी नगर ( औरंगाबाद ) येथे पोस्टिंग होती.त्यांनी चीनच्या सीमेवर दुर्गम ठिकाणी तीन वर्षे सेवा बजावली.अशाप्रकारे भारतीय सैन्यदलातील गौरवास्पद व निष्कलंक सेवा बजावून ते ३१ मार्च २०२५…
नाशिक प्रतिनिधी नाशिक येथे मातीस्नान उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, नाशिक भाजप पर्यटन आघाडी संयोजक व य़ोगगुरु नंदकुमार देसाई,महेश शहा व चिराग शहा यांचे संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक चांभार लेणी पायथ्याशी आज माती स्नान उपक्रम व व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. राज्यातील ५०० हुन अधिक लोकांनी माती स्नानचा आनंद लूटला.आपल्या शरीरातील अनेक व्याधी मातीस्नान केल्यामुळे बरे होत असतात असा आरोग्य तज्ञांचा दावा आहे. गेली २५ हुन अधिक वर्षं नंदकुमार देसाई व त्यांचे सहकारी सदर कार्यक्रम करत आहेत.हनुमान जन्मोत्सव नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो.हनुमान जन्मोत्सव नंतर नाशिकचे तपमान ४० डिग्री होत असते.या स्नानामुळे उष्माघाताचा त्रास कमी…
सुरेश वैद्य,पालघर पालघर येथे जय भीम पदयात्रा संपन्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या.त्यापैकी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही शिकवण विद्यार्थ्यांनी आचरणात आणली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने पालघर जिल्ह्यात जय भीम पदयात्रा काढण्यात आली.त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे बोलत होते. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रानडे पुढे म्हणाले की,बाबासाहेबानी आपल्याला ज्या तीन गोष्टी शिकवल्या आहेत त्याचे पालन करावे. बुद्धिमतेचा विकास करणे,हे आपले ध्येय असले पाहिजे. सगळ्यात महत्वाचे…
मनिष धानू,डहाणू डहाणूच्या प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रेस प्रारंभ, डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे.हे जागृत देवस्थान मानले जात असून ही देवी नवसाला पावते,असा लाखो भाविकांचा विश्वास आहे.ठाणे व पालघर जिल्ह्यातील भाविकांबरोबर गुजरातमधील भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात.गुजरातमधील भाविकांची या देवीवर विशेष श्रध्दा आहे.देवीची यात्रा सुरू झाली असून सतत पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेची जय्यत तयारी असल्याची माहिती श्री महालक्ष्मी ट्रस्टतर्फे देण्यात दिली.यात्रेदरम्यान प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते.पालघर,ठाणे या जिल्ह्यातून तसेच शेजारच्या गुजरात राज्यातून लहान मोठे व्यापारी येथे भरणाऱ्या बाजारात माल माल विक्रीसाठी घेवून येत असतात. या महालक्ष्मी देवीला…
दीपक मोहिते, भयावह स्थिती राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होणार ? गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत आहे.या घटत्या संख्येमुळे शाळांमध्ये शिक्षकांची गरजही कमी होत चालली आहे.परिणामी, शिक्षण विभागाने नवीन संचमान्यता धोरण जाहीर केले असून,त्याची अंमलबजावणी लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. राज्यातील प्राथमिक,उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची पदे आता आधार व्हॅलिड विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे निश्चित केली जाणार आहेत. म्हणजेच,केवळ नावनोंदणीपुरती संख्या न पाहता,आधार कार्डवर आधारित खऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती विचारात घेतली जाणार आहे. सरकारने १५ मार्च २०२४ रोजी हे धोरण,अधिकृतरित्या जाहीर केले असून नवीन शाळा सुरू करताना,वर्ग वाढवताना किंवा शाळेची रचना बदलताना हे निकष लागू होणार…
दीपक मोहिते, ” सुर्यातीर,” देवदूत दुर्लक्षित होता कामा नयेत, कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून साफसफाईची कामे करणाऱ्या सफाई कामगारांची कहाणी अत्यंत ह्रदयद्रावक अशीच आहे.नोकरीला संरक्षण नाही,त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही,सेवानिवृत्तीनंतरचे लाभ नाहीत,वैद्यकीय सोयी-सुविधांची वानवा व क्षेत्रात शिरकाव केलेली ठेकेदारी इ.कारणामुळे आजही हा कामगार अंधारात चाचपडत आहे. गेल्या पंच्याहत्तर वर्षात सरकारने या कामगारांचे जीवन सुसह्य व्हावे,यासाठी अनेक आयोग नेमले,पण त्यांना आजतागायत न्याय मिळू शकला नाही.आयोगाचे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी हे कधी काळी दौरे करतात व सरकारी पाहुणचार घेत असतात.आज ठेकेदारीवर काम करणारे लाखो सफाई कामगार किमान वेतन,भविष्य निर्वाह निधी,उपदान निधी,वैद्यकीय लाभ इ.फायद्यापासून वंचित आहेत.त्यांच्या हितासाठी निर्माण झालेले सर्व…
दीपक मोहिते, देश उद्या महामानवाची १३५ वी जयंती साजरी करणार आहे, डॉ.भीमराव आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जातात.ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री देखील होते.भारताचे संविधान तयार करण्यात त्यांचे फार मोठे योगदान होते.पण जगाला मार्गदर्शक ठरलेले आपले संविधान आता धोक्यात सापडले आहे.या महान दस्ताऐवजाच्या गळ्याला नख लावण्यासाठी काही शक्ती सक्रिय झाल्या आहेत. पण ते त्यांना कदापि शक्य होणार नाही.कारण या संविधानाशी १४० कोटी जनतेचे भावनिक नाते आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिल रोजी देशभरात साजरी केली जाते.यंदा संपूर्ण देश त्यांची १३५ वी जयंती साजरी करत आहे.डॉ.भीमराव आंबेडकर ज्यांना बाबासाहेब म्हणूनही ओळखले जाते.ते एक प्रख्यात विद्वान,वकील, सामाजिक…
दीपक मोहिते, विरार लोकल …नाबाद १५८ वर्षे, पश्चिम रेल्वे मार्गावर धावणारी विरार लोकल आज १५८ वर्षाची झाली.गेली दिड शतक अविरतपणे धावणारी विरार लोकल व तीचा डौल आजही कायम आहे.पश्चिम रेल्वेला आणि प्रवाशांंच्या जिवनाशी एकरूप झालेल्या या लोकलचा प्रवाशांना मात्र विसर पडला होता. मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांच्या पुढाकाराने हिंदुस्थानातील पहिली रेल्वे बोरीबंदर मार्गावर १६ एप्रिल १८५३ रोजी धावली.त्यानंतर तब्बल १४ वर्षानी म्हणजेच १२ एप्रिल १८६७ रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली विरार लोकल धावली.आताही पहिली विरार लोकल पकडणे म्हणजे तारेवरची कसरत. प्रचंड गर्दीत या लोकलमध्ये सीटवर बसायला सोडा,डब्यात शिरायलाही जागा मिळत नाही.तरीही प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली ही लोकल त्यांच्या सुखदुःखाशी एकरूप…
दीपक मोहिते, ” इथे रंगले मानापमानाचे नाट्य,अवघा महाराष्ट्र ओशाळला,” केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा काल राज्याचा दौरा पार पडला.या दौऱ्यात अमित शहा यांनी किल्ले रायगडला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजाना अभिवादन केले.पण त्यांच्या या दौऱ्यादरम्यान तीन इंजिन सरकारमधील सुंदोपसंदी उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळाली.यावेळी रंगलेल्या मानापमान नाट्यामुळे माध्यमामध्ये सर्वत्र खमंग चर्चेला उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या तीन इंजिन सरकारच्या मंत्र्यामध्ये मंत्रीपदे,मलईदार खाते व पालकमंत्रीपदावरून चांगलेच धमासान सुरू झाले होते.रायगड व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपदे वगळता अन्य समस्या कशाबशा मार्गी लागल्या.पण रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा मात्र सुटू शकला नाही.नाशिक येथे शिवसेना ( शिंदे गट ) – भाजप व रायगडमध्ये राष्ट्रवादी…
