नाशिक प्रतिनिधी
नाशिक येथे मातीस्नान उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,
नाशिक भाजप पर्यटन आघाडी संयोजक व य़ोगगुरु नंदकुमार देसाई,महेश शहा व चिराग शहा यांचे संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक चांभार लेणी पायथ्याशी आज माती स्नान उपक्रम व व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
राज्यातील ५०० हुन अधिक लोकांनी माती स्नानचा आनंद लूटला.आपल्या शरीरातील अनेक व्याधी मातीस्नान केल्यामुळे बरे होत असतात असा आरोग्य तज्ञांचा दावा आहे.
गेली २५ हुन अधिक वर्षं नंदकुमार देसाई व त्यांचे सहकारी सदर कार्यक्रम करत आहेत.हनुमान जन्मोत्सव नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो.हनुमान जन्मोत्सव नंतर नाशिकचे तपमान ४० डिग्री होत असते.या स्नानामुळे उष्माघाताचा त्रास कमी होतो. यानिमित्ताने आज रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आलं होते.आज झालेल्या मातीस्नान उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

