वसंत भोईर,वाडा
वाडा सहकारी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी विकास पातकर यांची निवड,
वाडा शहरातील वाडा सहकारी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी विकास पातकर तर सचिवपदी प्रमोद भोईर, उपाध्यक्ष अॅड मनोज पष्टे, स्कूल कमिटी चेअरमन ( पा.जा. हायस्कूल वाडा ) दिलीप पाटील,को.ऑर्डीनेशन स्कूल कमिटी चेअरमन ( सरस्वती विद्या मंदिर कंचाड ) हरिभाऊ पाटील,सहसचिवपदी विकास जाधव आदी पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी सभेमध्ये काल निवड करण्यात आली.
वाडा तालुक्यातील नावाजलेल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची काल बैठक पार पडली.या बैठकीत संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.गेल्या पंचवीस वर्षापासून या संस्थेचा अनागोंदी कारभार सुरू होता. त्यापासून संस्थेची मुक्तता करून शाळेची शैक्षणिक प्रगती व स्वच्छ पारदर्शक काम करण्यासाठी ही कमिटी बांधील असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष पातकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

