- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” नियती खरंच श्रेष्ठ आहे, ” सहा वर्षांपूर्वी रंगलेला ” रात्रीचा खेळ चाले,” चा प्रयोग आजही नालासोपारावासियांच्या आठवणीत आहे, आजच्या दिवशी बरोबर सहा वर्षांपूर्वी मध्यरात्री नालासोपारावासीय गाढ झोपेत असताना,शहराच्या मध्यवर्ती भागात काही राजकीय व्यक्ती वेगळ्याच कामात गुंतल्या होत्या.ही मंडळी त्यावेळी ” रात्रीचा खेळ चाले,” या अदभुत प्रयोगाला अंजाम देत होते.याचा सुगावा लागताच,सर्वत्र एकच गदारोळ उठला.त्यावेळी तेथे असलेल्या गाडीत नक्की काय आहे ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.सोशल मीडियावर क्षणार्धात या उपदव्यापाची व्हीडीओ क्लिप वायरल झाली व नक्की काय प्रकार सुरू होता,याचा मतदारांना उलगडा झाला. वसईच्या नसलेल्या गुंडगिरीवर भरभरून बोलणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकसंघ सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…
सुरेश वैद्य,पालघर पालघर जिल्ह्यात ” सेवा हक्क दिन,” उत्साहात साजरा, राज्यात सर्वत्र २८ एप्रिल हा दिवस “ सेवा हक्क दिन,” म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या अंमलबजावणीची ” दशकपूर्ती,” आणि ” प्रथम सेवा हक्क दिन,” निमित्त पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे जिल्हाधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली “ सेवा हक्क दिन,” आज उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी “ सेवा हक्क शपथ,” घेतली तसेच सेवा हक्क दिन उपक्रमास दहा वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल जिल्हा व तालुका पातळीवर विविध विशेष उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी…
सुगंध जोशी,बोरिवली, गोखले हायस्कूलच्या चैतन्य उन्हाळी शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, बोरिवली येथील नामदार गोपाळ कृष्ण गोखले हायस्कूल येथे रोटरी क्लब ऑफ मुंबई नॅशनल पार्क यांच्या सहकार्याने तीन दिवसीय चैतन्य उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या बौद्धिक मानसिक व शारीरिक व कलागुणांचा विकास अशी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून २८ ते ३० एप्रिल या तीन दिवसाच्या चैतन्य उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त योगासने,श्वसनतंत्र, बुद्धिबळ,हस्तकला व नृत्यकला यांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात गोखले एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन डॉ.सुहासिनी संत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,सध्या परीक्षा संपलेल्या आहेत, त्यामुळे भयमुक्त व तणावविरहित…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपमध्ये भाटांची भाऊगर्दी… भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अधून मधून बऱ्यापैकी विनोद करत असतात.त्यांच्या या विनोदाला किती दर्जा असतो,हा वादाचा मुद्दा असला तरी त्यांचे हे गुऱ्हाळ अधून मधून चालुच असते.काल त्यांनी २०३४ पर्यंत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच असतील,अशी भविष्यवाणी करून टाकली.त्यांच्या या भाटगिरी करण्याच्या स्वभावाला अनुसरून त्यांनी हे वक्तव्य केले आहे,अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता होऊ लागली आहे.गेल्या निवडणुकी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या व पंकजा मुंडे यांना पावलोपावली डावलले होते. विधानसभा व विधान परिषदेच्या उमेदवारीपासून वंचित ठेवले होते,त्या फडणवीसांचा ” फडणवीस चालीसा,” पठण करण्यात बावनकुळे,नितेश राणे व नवनीत राणा,हे तिघे सतत आघाडीवर असतात.नितेश राणे यांनी…
सचिन परब,वसई शिवसेनेत विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश, वसई,नालासोपारा विधानसभेतील अनेक राजकीय,सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.या पक्षप्रवेशामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या लाडक्या बहिणी पक्षात प्रवेश करीत आहेत असे सामाजिक कार्यकर्ता ट्रिझा परेरा यांनी सांगितले.यावेळी अनेक युवा व वरिष्ठ कार्यकर्त्यांनी प्रवेश करताना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सर्वसमावेशक असल्याचे सांगितले.या सर्व पक्षप्रवेशा वेळी सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेना परिवारात स्वागत करताना जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा पक्ष असून आपल्या सर्वांच्या हातून लोकांची कामे होतील,अशी अपेक्षा व्यक्त केली.या कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हा प्रमुख ऍड.अनिल चव्हाण,दिवाकर…
नदीम शेख,पालघर पालघर येथे मजुरांना ७६ लाख रु.च्या गृहउपयोगी वस्तूंचे वाटप, इमारती,वीटभट्टी व इतर कामावर मजुरी करणाऱ्या ९०० मजुरांना आज पालघर येथे ७६ लाख ५० हजार रु.ची संसारोपयोगी भांड्यांचे वाटप करण्यात आले.सदर उपक्रम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई व कामगार उपायुक्त पालघर यांच्यातर्फे लायन्स क्लब सभागृह येथे करण्यात आला. यावेळी पालघर विधानसभेचे आ.राजेंद्र गावित सहा.आयुक्त कामगार विभाग विजय चौधरी जिल्हाप्रमुख कुंदन संखे, केदार काळे,राहुल घरत, सविता मल्लाह संजू धोत्रे आदी उपस्थित होते. प्रत्येक लाभार्थ्याला ८ हजार ५०० रु.ची भांडी देण्यात आली.याचा फायदा समाजातील प्रत्येक घटकाला होणार आहे.याचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घेतला पाहिजे. काळी माती ही…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे आदिवासी समाजाचे एकता व सांस्कृतिक महासंमेलन संपन्न, आदिवासी कोकणा,कोकणी व कुकणा समाजाच्या वैचारिक एकता व सास्कृतिक महासंमेलन आज जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियम येथे संपन्न झाले. या वैचारिक व सांस्कृतिक महासंमेलनाचा मुख्य उद्देश समाजातील अन्याय,अत्याचाराचा निषेध करणे तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर उपाययोजना करणे असा होता.सदर मेळाव्याची सुरुवात हनुमान पॉइंट येथील खंडेराव मंदिरापासून भव्य सांस्कृतिक महारॅलीने झाली.रॅलीमध्ये कोकणा,कोकणी व कुकणा जमातीतील पारंपरिक देवदेवतांचे सादरीकरण, आदिवासी वाद्यांचा गजर,तारपा,पावरी नृत्य,सांबळ नृत्य,गौरी नाच, महिला डोक्यावर गौरी घेवून पारंपरिक पोशाखात सहभागी झाल्या होत्या.अंबिका चौक, तारपा चौक,गांधी चौक, पाचबत्ती नाका,यशवंत नगर मार्गे आदिवासी क्रांतिकारक चौक ते राजीव गांधी स्टटेडियम पर्यत पायी…
वसंत भोईर,वाडा सरपंच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात,ग्रामसेवकांनी ठोकली धूम, तालुक्यातील सापरोंडे -मागाठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा गवारी यांना ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी १९ हजारांची लाच घेताना ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना नुकतीच घडली होती. त्याची माहिती या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक किरण हरड यांना कळल्यानंतर आपली पण या प्रकरणी चौकशी होईल,या भीतीने ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावून ते पसार झाल्याच्या चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे. ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरणाचे काम पूर्ण होत असल्याने ठेकेदार या ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे बिल काढण्यासाठी वारंवार हेलपाटे मारूनही केलेल्या कामाचे बिल मिळत नव्हते.संबंधित कामाचे बिल अदा करण्याची जबाबदारी सरपंचासह प्रशासकीय अधिकारी…
संदीप जाधव,बोईसर सूर्या नदीसाठी जनआक्रोश ; पांजरेत करमतारा कंपनीविरोधात जोरदार एल्गार, बोईसर पूर्व परिसरात सूर्या नदीचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी आणि बोईसर, तारापूर वसई-विरार परिसरातील जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी स्थानिक नागरिकांनी करमतारा कंपनीच्या विरोधात पांजरे येथे सभेचे आयोजन केले होते. रविवारी दुपारी अकराच्या सुमारास हे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विविध सामाजिक संघटनांचे नेते आणि नागरिकांनी नव्याने होवू घातलेल्या करमतारा कंपनीला या परिसरात पाय रोवू देणार नाही,असा निर्धार व्यक्त केला. उलगुलान ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंगाडा,मनसेचे पालघर जिल्हा अध्यक्ष भावेश चुरी,भूमी सेनेच्या नेत्या नीता काटकर,आदिवासी एकता परिषदे नेते दत्ता करबट, सामाजिक कार्यकर्ते रमेश डोंगरे,वैभव पाटील,कुणबी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,संजय पाटील,रोहन पाटील,लोकशाहीर…
दीपक मोहिते, सीमेवरील वास्तव, जल सिंधू करार ; अंमलबजावणी होणे कठीणच, आम्ही चीनची मदत घेऊ,पाकची दर्पोक्ती, सिंधू जल कराराला भारतानं स्थगिती दिली आहे.तसे पत्र पाकिस्तानला पाठवण्यात आले आहे.पाकिस्तानवर सीमापार दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप करत भारतानं पाकिस्तान विरोधात उचललेलं महत्वाचे पाऊल असल्याचे मानण्यात येत आहे.पण आपल्या या निर्णयाची अंमलबजावणी होणे अशक्य आहे. पाकिस्तानने नेहमीप्रमाणे ” या हल्ल्याशी आमचा कोणताही संबंध नाही,” असे सांगत पाकिस्तानने भारताचे सारे आरोप फेटाळले आहेत.दुसरीकडे त्यांचे मंत्री तर युद्ध करण्याची धमकी देत सुटले आहेत.पाकिस्ताननेही आता भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी पावलं उचलली आहेत.पाकिस्ताननं म्हटलं आहे की,” पाणी रोखणे ” हे युद्धाला आमंत्रण देण्यासारखे आहे.” त्यामुळे भारताने असा आतताईपणा…
