नवीन पाटील,सफाळे
पालघरच्या साईराज पाटील याला मुंबई टी २० स्पर्धेसाठी सर्वाधिक बोली,
आयपीएलच्या लिलावात दुर्लक्षित राहिलेला व गत मोसमात मुंबईकडून मर्यादित षटकाचा एकही सामना न खेळलेल्या पालघरच्या साईराज बिपिन पाटील याला मुंबई टी-२० च्या लिलावात ईगल ठाणे स्टायकर्स संघाने सर्वाधिक म्हणजेच १५ लाख रु.ची बोली लावली.
पालघर जिल्ह्यातील साईराज हा विरार डहाणू तालुका क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.
मध्यगती गोलंदाजी करणाऱ्या या अष्टपैलू खेळाडूंनी सध्या मोसमात मुंबईतील विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला आहे.ठाणे प्रिमियर लीग,सालारजंग,डी.वाय. पाटील अशा विविध स्पर्धांमध्ये त्यांनी प्रभावी कामगिरी केली होती.त्याची या कामगिरीची दखल ईगल ठाणे स्ट्रायकर्स संघाने घेतली आहे.
मर्यादित षटकाच्या लढतीसाठी मुंबईच्या संघात निवड झाली होती.पण अंतिम संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र,मुंबईतील विविध स्पर्धांत माझी कामगिरी चांगली झाली होती.स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूंचे बक्षीससुद्धा जिंकले होते.त्यामुळे लिलावात चांगला भाव मिळेल,अशी मला खात्री होती,असे साईराज पाटील याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

