वसंत भोईर,वाडा
कुडूसमध्ये दोन तरूणांना बेदम मारहाण,१८ जणांवर गुन्हे दाखल,
तालुक्यातील कुडूस येथे मांगाठणे येथील रूपेश पाटील हा तरूण आपल्या मित्रांसोबत काल सायंकाळी चायनीज पदार्थ खात असताना किरकोळ कारणावरून वादावादी झाली.काही तरुण जोराने ओरडत असल्याने त्याने चायनीज हॉटेल मालकाला आरोपींना हळू आवाजात बोलण्यास सांगितले.त्याचा मनात राग धरून रूपेश व कुणाल या दोघांना आरोपींनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या वादामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
सायम शेख,काल्या पूर्ण नाव माहीत नाही,सुभान सुसे, मोहाफीज सुसे,राजु सुसे, मोहम्मद घोस व अन्य १० ते १८👇 इसम अशी आरोपींची नावे आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,तालुक्यातील मागाठणे येथील रहिवासी असलेला रूपेश पाटील हा तरूण आपल्या मित्रांसोबत अभिषेक सिनेमा हाॅल येथे चायनीज खाण्यासाठी गेला होता.त्याचवेळी आरोपीही तेथे बसले होते.ते गोंधळ घालत असल्याने रूपेश याने चायनीज हॉटेल मालकाला आरोपींना हळू आवाजात बोलण्यास सांगितले याचा राग मनात धरून आरोपींनी ‘ ये हमारा नाका है,तुम्हारा इधर क्या है,तुम लोग बाहरसे आये है,चुपचाप खाना खाके निकल जाओ,अशी दमदाटी केली व शिविगाळ करून मारहाण केली.साक्षीदार कुणाल पाटील याचे डोक्यात प्लास्टिकची खुर्ची आपटली.कुणाल याला रूपेश वाचवण्यास गेला असता त्यालाही आरोपींनी लाकडी पट्टीने पाठीवर उपट्या मारून दुखापत केली.तसेच आरोपी सायम शेख याने त्याची पॅन्ट काढून ये हमारा कटा है ना वैसाही तुम्हारी भी काटेंगे,अशी धमकी देऊन ठोश्याबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अजित साबळे करीत आहेत.
सर्व आरोपी फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

