वसंत भोईर,वाडा
स्वतःची शेती दुसराच कोणीतरी कसतोय ,
कृषी निविष्ठांमुळे उत्पादन खर्च वाढला असताना शेतीला नैसर्गिक आपत्तीचा फटका दरवर्षी बसत आहे.अशा परिस्थितीत मजुरांची टंचाई व वाढती मजुरी,यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त आहे.घरी पिक कधी येईल,याची शाश्वती राहिली नाही.अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी शेती बटाईने दिली आहे.
पालघर जिल्ह्यातील शेती ही निसर्गावर अवलंबून आहे.त्यातच कृषी निविष्ठांच्या वाढत्या दराने उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे.शिवाय पेरणी,मजुरी व मशागतीचे दर वाढले आहेत.पिके काढणीच्या काळात पावसाचा तडाखा अन नेमके याचवेळी मजुरांचा तुटवडा असतो.त्यामुळे शेती करणे,हे बेभरवशाचे झाले आहे.
शेती व्यवसाय परवडणारा नाही,त्यामुळे काही जणांनी रोजगाराच्या शोधात आपला मोर्चा शहराकडे वळवला आहे. आणि काही शेतकरी शेती बटाईने देण्याकडे बहुसंख्य शेतकऱ्यांचा कल आहे. परिणामी शेतकऱ्यांकडे गुरे -ढोरे कमी झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याची शेती दुसराच कोणी तरी कसतोय, असे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
शेतमालाच्या दराचे काही खरे नाही,भाताला योग्य भाव मिळत नाही.शासनाने जाहीर केलेल्या बोनसचा पत्ताच नाही.त्यामुळे शेतमालाचे दर वाढतील,याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही.
पावसाचे देखील काही खरे नाही.अलीकडे जुलै महिन्यात महिन्यात पेरणी होत आहेत. शेतमाल काढणीच्या काळात धो धो पाऊस पडत असतो, यामध्ये दरवर्षी पिकाचे नुकसान होत आहे.
शेतमालाला हमीभाव: मिळत नाही,त्यामुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी होत असल्याने शेतकऱ्यांचा ताळेबंद बिघडला आहे.
दरवर्षी बियाणे,रासायनिक खते,कीटकनाशकांच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ होत असल्याने उत्पादन खर्च वाढला.पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरने होणाऱ्या मशागतीचे दर वाढले आहेत. शिवाय बैलजोडीच्या मशागतीचे दर वाढले आहेत.
शेतीसाठी सालगडी मिळत नाही,मिळाल्यास वार्षिक प्रकार वाढला आहे.शिवाय मजुरांचा तुटवडा असल्याने मजुरीची दरवाढ झाली आहे. त्यामुळे अनेकदा काढणी किंवा सवंगणीच्या वेळी पिकांचे नुकसान होते.
शेती बटाई न देणे म्हणजे शेतकरी स्वतःची शेती दुसऱ्याला कसण्यासाठी देतात.यामध्ये वर्षभराची रक्कम एक मुस्त घेतली जाते. किंवा प्रत्येक खर्च व होणारे उत्पन्न याची अर्धी विभागणी केली जाते.
शेती बटाईने अथवा मग त्याने घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य शेती कामे करतात.त्यामुळे ठराविक वेळेत कामे होऊन मजुरीची बचत होते आणि ते सदस्य शेती कामास उपलब्ध असतात. त्यामुळे शेतमजुरीचे कामेही स्वतःच करतात त्यामुळे खर्च कमी होतो.
निसर्ग साथ देत नाही, उत्पादन खर्चात दरवर्षी वाढ होत असल्याने भात शेती करणे,मोठ्या जिगरीचे काम झाले आहे. त्यामुळे उत्पादन खर्च निघत नसल्याने बटाईने शेती देण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
-शाम पाटील,शेतकरी

