वसंत भोईर, वाडा
वाडा येथे बालसंस्कार शिबिरातून घडतोय वारकरी संप्रदाय,
तालुक्यातील स्वर्गीय सुख निवासी ह.भ.प.गोविंद बाबा तपोभूमी मंदिर शेले फाटा येथे बालसंस्कार शिबिरातून मुलांना वारकरी,धार्मिक आणि संप्रदाय शिक्षण देण्यात येत आहे.यंदा प्रथमच ह.भ.प.रोहण पाडेकर, हार्दिक तरे यांच्या माध्यमातून विनामूल्य बाल संस्कार शिबिर भरविण्यात आले आहे.
काल शिबिराला सुरुवात झाली असून १८ मे पर्यंत ते चालणार आहे.या निवासी शिबिरात ८० बालके सहभागी झाली आहेत.ही सर्व बालके वाडा तालुक्यातील गाव खेड्यातून आध्यात्मिक धडे घेण्यासाठी या शिबिरामध्ये सहभागी झाली आहेत.
या शिबिरात मुलांना गायन,वादन,गीता पठण, ज्ञानेश्वरी वाचन,वारकरी चाली शिकवण्यात येतात.दररोज विविध विषयांवर कीर्तन, प्रवचन,पखवाद वादन, संध्याकाळी हरिपाठ,किर्तन, भजन कार्यक्रम सुरू आहेत. ही सर्व बालके या ठिकाणी निवासी राहत आहेत. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

