- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वसई/विरारच्या नागरिकांनी यंदाही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.. पावसाळा तोंडावर आला असून वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांना अद्याप वेग आलेला नाही.” ” नेमेची येतो पावसाळा,” या म्हणीप्रमाणे करदात्यांना यंदाही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागणार आहे.दर पावसाळ्यात वसई/ विरार भागात अनेक परिसर जलमय होत असतात.दरवर्षी नालेसफाईच्या कामावर कोट्यवधी रु.खर्च होत असतात.पण मनपा अधिकारी,ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांच्या मिलीभगतमुळे दरवर्षी नागरिकांना किमान तीन ते चार दिवस हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. वसई विरार उपप्रदेशात अतिवृष्टी झाली की उपप्रदेशात सर्वत्र हाहाकार उडतो.या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असते.नालासोपारा शहराच्या पूर्व भागात तुळींज,या गजबजलेल्या वस्तीच्या…
सफाळे,प्रतिनिधी, रोडखड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थासाठी योग प्रशिक्षण, पालघर जिल्ह्यातील सफाळे पूर्वेकडील रोडखड जिल्हा परिषदेच्या शाळेत रोटरी क्लब ऑफ मुंबई ( मकाबो ) यांच्यातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योग प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ मुंबई (मकाबो) च्या अध्यक्षा शुभदा मांजरेकर,सनदी अध्यक्ष संजय अग्रवाल,सोनल दोशी,योग प्रशिक्षक मीनल भिर्द, यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील गिरीधर,उपाध्यक्ष नीलम घरत तसेच शाळेतील सर्व शिक्षक, पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.योग प्रशिक्षक मीनल मर्द यांनी मुलांना सुलभ मार्गाने योग कसे करावे,याविषयी खूप सुरेख मार्गदर्शन केले.योगाचे जीवनातील महत्त्व सांगितले. त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. संजय अग्रवाल यांनी शाळेला साऊंड सिस्टिम भेट…
सुशील भोईर, सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास गटाची पहिली महत्वाची बैठक संपन्न, महाराष्ट्र विधान परिषद गटनेते प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास गटाची पहिली महत्त्वाची बैठक काल वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात पार पडली. या बैठकीत वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अत्यंत धोकादायक (C-1) प्रकारात समावेश असलेल्या २०० धोकादायक इमारतींच्या विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत,इमारतीचा पुनर्विकास रखडल्यामुळे हजारो कुटुंबांचे बेघर होण्याचे भिती आ.स्नेहा दुबे यांनी व्यक्त केली. महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करताना आ.प्रवीण दरेकर यांनी आ.स्नेहा दुबे पंडित यांची वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती जाहीर केली. तसेच नवी मुंबई-पनवेलसाठी आ.प्रशांत ठाकूर यांची वर्णी लावली. त्यामुळे आता वसई-विरार सह नवी मुंबईमधील…
सचिन परब, विरार, उसगाव येथे श्रमजीवी साहित्य मेळा २०२५ चे आयोजन, आदिवासी आणि श्रमिक समुदायाच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उत्थानासाठी समर्पित श्रमजीवी साहित्य मेळा थाटात पार पडला.ज्येष्ठ साहित्यिक प्रेमानंद गज्वी,अशोक नायगावकर आणि महेश केळुस्कर यांच्या हस्ते या मेळ्याचे उद्घाटन झाले.श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मेळ्याने साहित्यप्रेमींसह सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले.यावेळी उसगाव येथे असलेल्या फुलबाग वसतिगृहातील मुलींनी ” गीताई दिंडी, ” काढली.तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीस गीताई अध्यायाचे सादरीकरण करण्यात आले. उद्घाटन समारंभात विवेक पंडित,डॉ.मनोज रानडे,महेश केळुस्कर,प्रेमानंद गजवी, खासदार डॉ.हेमंत सवरा आणि अशोक नायगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विवेक पंडित आपल्या भाषणात म्हणाले,श्रमजीवी साहित्य…
दीपक मोहिते, सरकारचे बनावट प्रगती पुस्तक, काही दिवसापूर्वी हिंगोलीचे आ.संजय गायकवाड यांनी राज्य पोलिसांवर बेछूट आरोप केले होते.राज्याचे पोलीस भ्रष्ट असुन ५० लाख रु.पकडले तर पोलीस ५० हजार रु.च दाखवतात,असे ते म्हणाले होते.त्यांचा हा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागला होता. कारण गृहखाते त्यांच्याकडे आहे.त्यामुळे त्यांचा राग अनावर होणे, साहजिकच होते.त्यांनी त्वरित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गायकवाड विरोधात तक्रार केली व त्यांना योग्य ती समज द्या,असे सुनावले.त्यानंतर शिंदे यांनी आ.गायकवाड यांचे कान उपटले.या सर्व घडामोडीनंतर आ.गायकवाड यांनी सारवासारव करत या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली.वास्तविक आ. गायकवाड यांनी जे वास्तव समोर आणले होते.त्यामध्ये व १०० % तथ्य आहे.पण हल्लीच्या…
तलासरी प्रतिनिधी, तलासरी भागात बिबट्याचा दोघांवर हल्ला, तलासरी भागात बोर्डी वनविभागाच्या हद्दीत बिबट्याने हल्ल्यात दोन जण जखमी झाले.त्यांना तात्काळ तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी गुजरात राज्यातील बलसाड येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनेची खबर लागताच तलासरी पोलीस आणि बोर्डी वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी घटना स्थळी पोहोचले. आज सकाळी साडेआठच्या सुमारास शेतात पाला गोळा करण्यास गेलेल्या गुलाब मधुकर वरठा,रा.करजगांव, मानपाडा येथे राहणाऱ्या महिलेवर बिबट्याने अचानक मागून हल्ला केला.यावेळी प्रसंगावधान राखून त्या महिलेने हल्ला परतवून लावला आणि आरडाओरड केली, त्यामुळे बिबट्या पळून गेला.यात महिलेच्या पाठीवर आणि हातावर गंभीर दुखापत झाली.याघटनेनंतर थोड्याच वेळात बिबट्याने धामणगाव आपटोलपाडा येथे आपल्या वाडीत काम करणाऱ्या राज्या काकड्या…
दिपक मोहिते, रयतेची निव्वळ फसवणूक, देवाभाऊ,” अजब तुझे सरकार,” राज्य सरकारने १०० दिवस पूर्ण झाल्या संदर्भात प्रत्येक विभागाचा लेखाजोगा मांडला आहे.अनेक विभागाने पैकीच्या पैकी गुण मिळवत बाजी मारली आहे.आपण या लेखाजोगात पहिल्या पाच क्रमांकावर विराजमान झालेल्या पाच विभागावर बोलणार आहोत.हे पाच विभाग कोणते आहेत,याची सर्वप्रथम माहिती घेऊ या.. महिला व बालकल्याण,सार्वजनिक बांधकाम,कृषी,परिवहन व मत्स्य व बंदरे,असे ते पाच विभाग आहेत.या पाच विभागाची गेल्या १०० दिवसात कामगिरी कशी होती ? यावर एक प्रकाशझोत…. १ ) महिला व बालकल्याण – ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतांवर डोळा ठेवत तत्कालीन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली.( प्रत्येक महिलेला दरमहा १५००/- रु. ) त्यामुळे निवडणुकीत…
जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे संपूर्ण श्रेय राहुल गांधींना- आकाश छाजेड, काल केंद्र सरकारने जात निहाय जनगणनेचा जो निर्णय घेतला त्याचे संपूर्ण श्रेय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आहे.गेल्या काही वर्षापासून आमचे नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना व्हावी,यासाठी प्रयत्नशील होते.देशांमध्ये जातीची लोकसंख्या त्याच्या तुलनेत भागीदारी ही संकल्पना घेऊन राहुल गांधींनी लढाई लढली. देशातील वंचित घटक व सुशिक्षितांसाठी राहुल गांधींनी हा लढाई लढली.जातनिहाय जनगणना ही संकल्पना राहुल गांधींची होती.या राहुल गांधींच्या लढ्याला काल यश मिळाले म्हणून जातनिहाय जनगणण्याच्या निर्णयाचे संपूर्ण श्रेय हे राहुल गांधी यांना जाते,असे मत नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केले. शहर काँग्रेस ओबीसी विभागाचे…
जव्हार प्रतिनिधी, आदिवासी क्रांतिकारक चौक येथे अभिवादन कार्यक्रम, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज युवा आदिवासी संघाच्या वतीने विक्रमगड येथील आदिवासी क्रांतिकारक चौकात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमात विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आ.हरिश्चंद्र भोये यांनी राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात राघोजी भांगरे यांच्या बलिदानाचे स्मरण करून युवा पिढीने त्यांच्या आदर्श मार्गावर चालण्याचे आवाहन केले.कार्यक्रमास पंचायत समिती माजी सभापती सुरेश कोरडा, जामसर ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल थेतले,युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष राजू भोये,माजी अध्यक्ष हेमंत घेगड व मनोज कामडी,का यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने…
दीपक मोहिते, भाजपवाल्याना राष्ट्रहितापेक्षा पक्षीय हित मोठे, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या मिडियाने दोन देशात आता युद्धाला तोंड फुटणार,मोदी प्रत्येक दहशतवाद्याला हुडकून ठोकणार,पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे,अशा बातम्या पेरल्या.पण त्याचवेळी पाकिस्तानची आर्मी आपल्या टेहळणी चौक्यावर बेछूट गोळीबार करत होती. आपणही सारे लवकरच युद्ध सुरु होईल,अशी अपेक्षा बाळगून होतो.या घटनेला अकरा दिवस उलटल्यानंतरही आपल्या तपास यंत्रणाना अद्याप त्या पाच नराधमांचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही.हे आपल्या तपास यंत्रणा तसेच लष्कराचे अपयशच म्हणावे लागेल.पूर्वी दोन देशात युद्ध सुरू करणे,सहजशक्य होत असे.आता तशी स्थिती नाही.कारण काही किरकोळ अपवाद वगळता प्रत्येक देश आता अन्वस्त्रधारी देश बनला आहे.त्यामुळे युद्ध होणे,आजच्या घडीला कोणालाही परवडणारे नाही.पाकिस्तानला बेचिराख करण्याची…
