जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे संपूर्ण श्रेय राहुल गांधींना- आकाश छाजेड,
काल केंद्र सरकारने जात निहाय जनगणनेचा जो निर्णय घेतला त्याचे संपूर्ण श्रेय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आहे.गेल्या काही वर्षापासून आमचे नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना व्हावी,यासाठी प्रयत्नशील होते.देशांमध्ये जातीची लोकसंख्या त्याच्या तुलनेत भागीदारी ही संकल्पना घेऊन राहुल गांधींनी लढाई लढली.
देशातील वंचित घटक व सुशिक्षितांसाठी राहुल गांधींनी हा लढाई लढली.जातनिहाय जनगणना ही संकल्पना राहुल गांधींची होती.या राहुल गांधींच्या लढ्याला काल यश मिळाले म्हणून जातनिहाय जनगणण्याच्या निर्णयाचे संपूर्ण श्रेय हे राहुल गांधी यांना जाते,असे मत नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केले.
शहर काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष गौरव सोनार यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून एकच जल्लोष केला.राहुल गांधींच्या आदेशाप्रमाणे शहरातही वेळोवेळी या प्रश्नाकरता शहर काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने प्रयत्न केले,असे यावेळी गौरव सोनार यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या लढ्यामुळे देशातील जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला आहे,असे मत गौरव सोनार यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी माजी नगरसेवक शाहू महाराज खैरे,केशव अण्णा पाटील,माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, संदीप शर्मा,मध्य नाशिक ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे, पंचवटी ब्लॉक अध्यक्ष उद्धव पवार, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष अल्तमश शेख, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तन्वीर तांबोळी,संतोष ठाकुर, ज्ञानेश्वर चव्हाण, अण्णा मोरे, अनिल बेग,राजकुमार जेफ, डी पी बोडके,अब्दुल बावा, जावेद इब्राहिम,भालचंद्र पाटील,सिद्धार्थ गांगुर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

