सुशील भोईर,
सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास गटाची पहिली महत्वाची बैठक संपन्न,
महाराष्ट्र विधान परिषद गटनेते प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास गटाची पहिली महत्त्वाची बैठक काल वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात पार पडली.
या बैठकीत वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अत्यंत धोकादायक (C-1) प्रकारात समावेश असलेल्या २०० धोकादायक इमारतींच्या विषयावर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत,इमारतीचा पुनर्विकास रखडल्यामुळे हजारो कुटुंबांचे बेघर होण्याचे भिती आ.स्नेहा दुबे यांनी व्यक्त केली.
महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करताना आ.प्रवीण दरेकर यांनी आ.स्नेहा दुबे पंडित यांची वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती जाहीर केली.
तसेच नवी मुंबई-पनवेलसाठी आ.प्रशांत ठाकूर यांची वर्णी लावली.
त्यामुळे आता वसई-विरार सह नवी मुंबईमधील अडकलेले प्रकल्प मार्गी लागण्यासाठी शासन स्तरावर ठोस व प्रभावी पावले उचलली जाणार आहेत. लवकरच याविषयी अहवाल तयार करून अंमलबजावणीला ही गती दिली जाईल,असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

