जव्हार प्रतिनिधी,
आदिवासी क्रांतिकारक चौक येथे अभिवादन कार्यक्रम,
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज युवा आदिवासी संघाच्या वतीने विक्रमगड येथील आदिवासी क्रांतिकारक चौकात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमात विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आ.हरिश्चंद्र भोये यांनी राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण केली.
यावेळी त्यांनी आपल्या भाषणात राघोजी भांगरे यांच्या बलिदानाचे स्मरण करून युवा पिढीने त्यांच्या आदर्श मार्गावर चालण्याचे आवाहन केले.कार्यक्रमास पंचायत समिती माजी सभापती सुरेश कोरडा, जामसर ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल थेतले,युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष राजू भोये,माजी अध्यक्ष हेमंत घेगड व मनोज कामडी,का यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात राघोजी भांगरे यांचे योगदान आणि आदिवासी समाजातील त्यांच्या ऐतिहासिक भूमिकेवर चर्चा करण्यात आली.त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाज आणि संघटन मजबूत करण्याचा संकल्प या कार्यक्रमात करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा आदिवासी संघाच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला.

