- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन, आदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने आज रेड सोईल हॉटेल,जव्हार येथे कार्यशाळा पार पडली.सहा. जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी करिष्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके,पोलीस निरीक्षक किशोर मानभाव,राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण अमित मोतीराम भोये, टीटीएसएफ पालघर जिल्हाध्यक्ष विलास बेलकर, लेखक व आदिवासी साहित्यिक चंद्रकांत घाटाळ, मास्टर ट्रेनर दिलीप राठोड आणि पेसा व्यवस्थापक मनोज कामडी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रांतिकारक प्रतिमापूजन करून करण्यात आले. सदर कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांनी सायबर गुन्हेगारी,वाहतूक नियम…
बोईसर प्रतिनिधी, बोईसर – चिल्हार रस्त्यावर होणारे अपघात : आदिवासी संघटनेचा रास्ता रोको, बोईसर – चिल्हार मार्गांवर सतत होणारे अपघात व त्या अपघातामध्ये बळी पडणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन जनसामर्थ्य आदिवासी संघटनेचे महेश धोडी यांनी काल खैरेपाडा रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही हे आंदोलन करण्यात आले. तारापूर – बोईसर एमआयडीसीमध्ये होणारे सर्वसामान्यांचे अपघात या अशा ज्वलंत समस्येकडे लोकप्रतिनिधी,आमदार, खासदार,मंत्री,अविनाश संखे,उप कार्यकारी अभियंता, बोईसर,एमआयडीसी प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत असल्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आल्याचे सांगण्यात आले.नवीन उपअभियंता कामावर रुजू झाल्यापासून एमआयडीसीमध्ये बरेचसे अवैद्य धंदे स्थानिक माफियांकडून राजरोसपणे सुरू असून जनतेकडून करण्यात येत असलेल्या तक्रारींना स्थानिक एमआयडीसी कार्यालयाकडून केराची…
संजय लांडगे,वाडा वाडा येथे सायबर सुरक्षा विषयावर मार्गदर्शन व चित्रकला स्पर्धा संपन्न, पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या पालघर जिल्हा सायबर क्राईम विषयी असलेल्या संकल्पनेतून वाडा तालुक्यातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे मार्गदर्शन शिबिर व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त काल स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांमध्ये समाज माध्यमांचा योग्य प्रकारे वापर व्हावा,यासाठी वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक गुन्हे,सामाजिक सुरक्षितता, समाज माध्यम फेसबुक,इंस्टाग्राम,वापरताना घ्यावयाची काळजी,याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.शाळेतील सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन चित्राच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारी कशी रोखावी,यासाठी चित्ररेखाटने रेखाटली. यावेळी संस्थेचे सरचिटणीस वि.सु.कुळकर्णी सचिव योगेश विद्वास,शाळेचे…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” आप/काँग्रेसचा अहंकार ; भाजपच्या पथ्यावर… दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आम आदमी पार्टीचा सफाया केल्यानंतर भाजपमध्ये आता मुख्यमंत्री कोण ? यावरून वातावरण तापले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीय असलेल्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा,या दोघांची नांवे चर्चेत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्मृती इराणी यांच्यासाठी आग्रही आहेत,तर नव्याने निवडून आलेल्या आमदारांचा कल प्रवेश वर्मा यांच्या बाजूने आहे.त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागते,याकडे दिल्लीकरांचे लक्ष लागले आहे. २७ वर्षाच्या राजकीय संघर्षानंतर भाजपने आम आदमी पार्टीचा गड अखेर भेदला.या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अहंकाराला आवर घातला असता तर भाजपला इतके प्रचंड…
संदीप जाधव,बोईसर, २ कोटी ४२ लाखांच्या एम.डी. ड्रग्जसह एक आरोपी अटकेत, अमली पदार्थाचा विळखा आता ग्रामीण भागालाही पडू लागला आहॆ. वसई व नालासोपारा शहरात अनेक निग्रो वंशाच्या लोकांकडून पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त केल्याच्या घटना घडल्या होत्या.आता हे लोण पालघर व बोईसर भागात पसरत चालले आहॆ. आज बोईसर पोलिसांनी मोठी कारवाई करत काटकर पाडा परिसरात छापा टाकून तब्बल २ कोटी ४२ लाख रु.चे एम.डी. ड्रग्ज जप्त केले.या कारवाईत एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून,तो आपल्या राहत्या घरीच एम.डी.ड्रग्ज तयार करत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा केमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी पदवीधर असून, त्याने या घातक पदार्थाची निर्मिती आपल्या घरातच सुरू केली होती.बोईसर पोलिसांनी घटनास्थळावरून…
मनिष धानू,डहाणू, चिकू महोत्सवामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी – ना. अतुल सावे, शेती,उद्योग आणि संस्कृती यांचा पर्यटनाशी मेळ घालून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी चिकू महोत्सवाचे विशेष महत्त्व आहे,असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण,दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जामंत्री अतुल सावे यांनी केले. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बोर्डी येथे आजपासून सुरु झालेल्या २ दिवसीय ” चिकू महोत्सव २०२५” या कार्यक्रमाचे उद्घाटन अतुल सावे यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आ.राजेंद्र गावित,आ.विनोद निकोले, संदीप राऊत,शारदा पाटील, फेस्टिव्हलचे अध्यक्ष उदय चुरी,पर्यटन विभागाचे सहसंचालक हनुमंत हेडे, तहसिलदार सुनिल कोळी, सरपंच श्याम दुबळा,नरेश राऊत,एन.के.पाटील,प्रभाकर सावे आदि मान्यवर उपस्थित होते. ना.सावे आपल्या भाषणात पुढे म्हणाले,या महोत्सवात चिकू आणि…
वसंत भोईर,वाडा भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवींवर हद्दपारीची कारवाई, तालुक्यातील पाहुणीपाडा येथील राहत असलेले व विविध गुन्ह्यांची नोंद असलेले भास्कर लडकू दळवी याला पालघर नाशिक व ठाणे या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.वाड्याचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी डाॅ.संदीप चव्हाण यांनी ही कारवाई केली आहॆ.प्रशासनाच्या या कारवाई मुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. भास्कर दळवी यांच्यावर खून,खूनाचा प्रयत्न,दरोडा, मारामारी,जुगार,बेकायदेशीर जमाव करून हिंसा घडवणे, नुकसान करणे,ऑर्म अँक्ट,शिवीगाळ,दमदाटी, मारामारी,शासकीय आदेशाचे जाणूनबुजून पालन न करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एका गुन्ह्य़ात त्याला सजाही सुनावण्यात आली आहे.दळवी यांच्याकडून पुन्हा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन परिसरात…
वसंत भोईर,वाडा, आदिवासी मुलींसाठी ज्युडो,कराटे व जीवन कौशल्य प्रशिक्षण – एक महत्त्वपूर्ण उपक्रम पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील मुलींना आत्मसंरक्षण तसेच कौशल्ये विकसित करण्यासाठी जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागपालघर यांच्या माध्यमातून सन २०२४-२५ या वर्षाकरिता जिल्हा वार्षिक आदिवासी विकास योजनेअंतर्गत जुडो कराटे आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ५० शाळांमध्ये प्रत्येकी ४० मुलींना जुडो व कराटेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.कै.दिगंबरराव पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा,आंबिस्ते येथे भेट देऊन जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद,पालघर,प्रवीण भावसार यांनी आढावा घेतला. त्यांच्यासोबत बालविकास प्रकल्प अधिकारी,वाडा व पर्यवेक्षिका उपस्थित होत्या. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत विलास जाधव आणि माध्यमिक…
संजय लांडगे,वाडा, वाड्याच्या हरेश पाटील याला राज्यपालांच्या हस्ते उत्कृष्ट छायाचित्रकाराचा राज्य पुरस्कार प्रदान, वाडा तालुक्यातील कुडूस, मागाठणे येथील हरेश गोपाळ पाटील यांना उत्कृष्ट छायाचित्रणासाठी ६४ व्या महाराष्ट्र शासन कला संचालनालय विभागातर्फे देण्यात येणारा व्यवसायिक कलाकार विभागाचा प्रतिष्ठित ” राज्य पुरस्कार २०२४-२५,” राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते देण्यात आला. महाराष्ट्रातून अनेक कलाकारांनी आपल्या कलाकृती या स्पर्धेसाठी पाठवल्या होत्या.सुमारे १८० कलाकारांची निवड कला प्रदर्शनासाठी करण्यात आली होती.अंतिम टप्प्यात वेगवेगळ्या विभागामध्ये निवड झालेल्या १५ कलाकारांना राज्य पुरस्कार प्रमाणपत्र आणि ५२ हजार पाचशे रु. रोख देण्यात आले.हरेश पाटील याला मिळालेल्या राज्य पुरस्कराबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सन्मान म्हणजे त्याच्या कलासाधनेची मोठी…
दीपक मोहिते, अरविंद केजरीवाल यांचा गड जमिनदोस्त,पक्षाचे दिग्गज नेते पराभूत, आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा प्रवेश वर्मा यांनी अटीतटीच्या लढतीत ३ हजार १८२ मतांनी पराभव केला.प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे चिरंजीव असून त्यांनी यापूर्वी २०१५ व २०२० च्या निवडणुकीत बाजी मारली होती.या निवडणुकीत त्यांनी केजरीवाल यांचा पराभव करत हॅटट्रिक साधली आहे. अरविंद केजरीवाल सह मनीष सिसोदिया,सत्येंद्र जैन,सोमनाथ भारती,सौरभ भारद्वाज व अवध ओझा, या सहा दिग्गज उमेदवारांना दिल्लीच्या मतदारांनी धूळ चारली.त्यांच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी या कशाबशा जिंकल्या.गेल्या निवडणुकीत ६२ जागा जिंकणाऱ्या आम आदमी पार्टीची गाडी २३ जागांवर अडखळली.या लढतीत भाजपने मात्र ८ जागांवरून…
