संदीप जाधव,बोईसर,
२ कोटी ४२ लाखांच्या एम.डी. ड्रग्जसह एक आरोपी अटकेत,
अमली पदार्थाचा विळखा आता ग्रामीण भागालाही पडू लागला आहॆ. वसई व नालासोपारा शहरात अनेक निग्रो वंशाच्या लोकांकडून पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त केल्याच्या घटना घडल्या होत्या.आता हे लोण पालघर व बोईसर भागात पसरत चालले आहॆ.
आज बोईसर पोलिसांनी मोठी कारवाई करत काटकर पाडा परिसरात छापा टाकून तब्बल २ कोटी ४२ लाख रु.चे एम.डी. ड्रग्ज जप्त केले.या कारवाईत एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून,तो आपल्या राहत्या घरीच एम.डी.ड्रग्ज तयार करत होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा केमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी पदवीधर असून, त्याने या घातक पदार्थाची निर्मिती आपल्या घरातच सुरू केली होती.बोईसर पोलिसांनी घटनास्थळावरून एम.डी. ड्रग्जसह इतर साहित्य जप्त केले आहे.
याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून,पुढील तपास सुरू आहे.पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

