संजय लांडगे,वाडा,
वाड्याच्या हरेश पाटील याला राज्यपालांच्या हस्ते उत्कृष्ट छायाचित्रकाराचा राज्य पुरस्कार प्रदान,
वाडा तालुक्यातील कुडूस, मागाठणे येथील हरेश गोपाळ पाटील यांना उत्कृष्ट छायाचित्रणासाठी ६४ व्या महाराष्ट्र शासन कला संचालनालय विभागातर्फे देण्यात येणारा व्यवसायिक कलाकार विभागाचा प्रतिष्ठित ” राज्य पुरस्कार २०२४-२५,” राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते देण्यात आला.
महाराष्ट्रातून अनेक कलाकारांनी आपल्या कलाकृती या स्पर्धेसाठी पाठवल्या होत्या.सुमारे १८० कलाकारांची निवड कला प्रदर्शनासाठी करण्यात आली होती.अंतिम टप्प्यात वेगवेगळ्या विभागामध्ये निवड झालेल्या १५ कलाकारांना राज्य पुरस्कार प्रमाणपत्र आणि ५२ हजार पाचशे रु. रोख देण्यात आले.हरेश पाटील याला मिळालेल्या राज्य पुरस्कराबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हा सन्मान म्हणजे त्याच्या कलासाधनेची मोठी पावती असून,संपूर्ण जिल्ह्यासाठी तो अभिमानास्पद आहे.
सदर कलाप्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे ४ ते १० फेब्रु.दरम्यान कलाप्रेमीना पाहण्यासाठी खुले आहे.

