दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
आप/काँग्रेसचा अहंकार ; भाजपच्या पथ्यावर…
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आम आदमी पार्टीचा सफाया केल्यानंतर भाजपमध्ये आता मुख्यमंत्री कोण ? यावरून वातावरण तापले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीय असलेल्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा,या दोघांची नांवे चर्चेत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्मृती इराणी यांच्यासाठी आग्रही आहेत,तर नव्याने निवडून आलेल्या आमदारांचा कल प्रवेश वर्मा यांच्या बाजूने आहे.त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागते,याकडे दिल्लीकरांचे लक्ष लागले आहे.
२७ वर्षाच्या राजकीय संघर्षानंतर भाजपने आम आदमी पार्टीचा गड अखेर भेदला.या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अहंकाराला आवर घातला असता तर भाजपला इतके प्रचंड यश मिळाले नसते.इंडिया गटात असलेल्या आप व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन घटक पक्षांनी आघाडी केली असती तर भाजप ४८ जागांची मजल मारू शकला नसता.या दोघांच्या
मतांमध्ये विभागणी झाल्यामुळे भाजपला दहा जागांवर फायदा झाला.
या दहा जागांवर भाजपला कसा विजय मिळाला,ते पाहूया..
१) बादली मतदारसंघ-
भाजप-३५,४३६,
आप-२८,८४७,
काँग्रेस-२६,३५९,
भाजपचा उमेदवार ६,५८९ मतांनी विजयी,
२) नांगलोई जाट मतदारसंघ-
भाजप-५६,०३०,
आप-,३८,७५३,
काँग्रेस-२४,५५२,
भाजपचा उमेदवार १७,२७७ मतांनी विजयी,
३) मादीपूर मतदारसंघ-
भाजप-५२,०१९,
आप-४१,१२०,
काँग्रेस-१७,९५८,
भाजपचा उमेदवार १०,८९९ मतांनी विजयी,
४) राजेंद्र नगर मतदारसंघ-
भाजप-४६,६७१,
आप-४५,४४०,
काँग्रेस-४,०१५,
भाजपचा उमेदवार १,२३१ मतांनी विजयी,
५) नवी दिल्ली-
भाजप-३०,०८८,
आप-२५,९९९,
काँग्रेस-४,५६८,
भाजपचा उमेदवार ४,०८९ मतांनी विजयी,
६) जंगपुरा मतदारसंघ-
भाजप-३८,८५९,
आप-३८,१८४,
काँग्रेस-७,३५०,
भाजपचा उमेदवार ६७५ मतांनी विजयी,
७) कस्तुरबा नगर मतदारसंघ-
भाजप-३८,०६७,
काँग्रेस-२७,०१९,
आप-१८,६१७,
भाजपचा उमेदवार ११,०४८ मतांनी विजयी,
८) महरोली मतदारसंघ –
भाजप-३०,९३१,
आप-३०,०७५,
काँग्रेस-५,२२३,
भाजपचा उमेदवार ८५६ मतांनी विजयी,
९) संगम विहार मतदारसंघ-
भाजप-५४,०४९,
आप-५३,७०५,
काँग्रेस-१५,८६३,
भाजपचा उमेदवार ३४४ मतांनी विजयी,
१०) ग्रेटर कैलाश मतदारसंघ-
भाजप-४९,५९४,
आप-४६,४०६,
काँग्रेस-६,७११,
भाजपचा उमेदवार ३,१८८ मतांनी विजयी,
निकालाचे हे चित्र पाहता आप व काँग्रेस या दोघांच्या अहंकारामुळे भाजपला चांगलाच फायदा झाला.या दोघांनी समजूतदारपणा दाखवत ही
निवडणूक लढवली असती तर भाजपला ३८ जागांवर समाधान मानावे लागले असते.पण त्यांचा अहंकार आड आला व आजच्या घडीला दोन्ही पक्षाचे होत्याचे नव्हते झाले.दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत २३ उमेदवार उभे करून आपल्या ” अफाट शक्तीचा अचाट प्रयोग,” करून स्वतःचे हसं करून घेतले,त्यांच्या सर्वच्या सर्व उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.वास्तविक अजित पवार यांनी हे धाडस कशाच्या जोरावर केले,हे कळायला मार्ग नसला तरी आपला पक्ष राष्ट्रीय पातळीवर निवडणूक लढवू शकतो,हे निवडणूक आयोगाला दाखवण्यासाठी हा प्रयोग केला असावा,असे वाटते.

