बोईसर प्रतिनिधी,
बोईसर – चिल्हार रस्त्यावर होणारे अपघात : आदिवासी संघटनेचा रास्ता रोको,
बोईसर – चिल्हार मार्गांवर सतत होणारे अपघात व त्या अपघातामध्ये बळी पडणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन जनसामर्थ्य आदिवासी संघटनेचे महेश धोडी यांनी काल खैरेपाडा रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही हे आंदोलन करण्यात आले.
तारापूर – बोईसर एमआयडीसीमध्ये होणारे सर्वसामान्यांचे अपघात या अशा ज्वलंत समस्येकडे लोकप्रतिनिधी,आमदार, खासदार,मंत्री,अविनाश संखे,उप कार्यकारी अभियंता, बोईसर,एमआयडीसी प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत असल्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आल्याचे सांगण्यात आले.नवीन उपअभियंता कामावर रुजू झाल्यापासून एमआयडीसीमध्ये बरेचसे अवैद्य धंदे स्थानिक माफियांकडून राजरोसपणे सुरू असून जनतेकडून करण्यात येत असलेल्या तक्रारींना स्थानिक एमआयडीसी कार्यालयाकडून केराची टोपली दाखवण्यात येते.त्यामुळे बोईसरवासियांमध्ये एमआयडीसी प्रशासना विरोधात प्रचंड असंतोष खदखदत आहॆ.
सामाजिक कार्यकर्ते तथा आंदोलक महेश थोडी यांनी एमआयडीसी प्रशासन,सार्वजनिक बांधकाम विभाग,स्थानिक पोलीस प्रशासन,पालघर जिल्हाधिकारी आणि पालघर जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री गणेश नाईक यांनी दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी केली आहॆ.

