संजय लांडगे,वाडा
वाडा येथे सायबर सुरक्षा विषयावर मार्गदर्शन व चित्रकला स्पर्धा संपन्न,
पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या पालघर जिल्हा सायबर क्राईम विषयी असलेल्या संकल्पनेतून वाडा तालुक्यातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे मार्गदर्शन शिबिर व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानिमित्त काल स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांमध्ये समाज माध्यमांचा योग्य प्रकारे वापर व्हावा,यासाठी वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक गुन्हे,सामाजिक सुरक्षितता, समाज माध्यम फेसबुक,इंस्टाग्राम,वापरताना घ्यावयाची काळजी,याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.शाळेतील सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन चित्राच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारी कशी रोखावी,यासाठी चित्ररेखाटने रेखाटली.
यावेळी संस्थेचे सरचिटणीस वि.सु.कुळकर्णी सचिव योगेश विद्वास,शाळेचे मुख्याध्यापक सुनिल पाडवी,पर्यवेक्षिका सुमन सूर्यवंशी,हेमंत फुलपगारे व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी मंडळाचे सदस्य सुनील खेडकर व शिक्षक गणेश कुमावत,राहुल रिंजड, अनंता लोखंडे,शकुंतला चौधरी,वैष्णवी ठाकरे, अंकिता मगरे,सावनी गव्हाळे,मीनाक्षी पाटील,यांनी विशेष प्रयत्न केले.

