- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, वसई – विरार भागात परवडणाऱ्या घरांसाठी गोदरेज कॅपिटलकडून अर्थसहाय्य, गोडरेज इंडस्ट्रीज समूहाची वित्तीय सेवा शाखा, गोडरेज कॅपिटलने आपल्या गृहवित्त उपकंपनीच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन विरार येथे केले. आवाक्यातील घरांना अर्थसहाय्य करण्यासाठी निवडण्यात आलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.वसई, बोईसर,डहाणू,पालघरसह अन्य जवळपासच्या भागातही ही शाखा सेवा पुरवेल आणि कमी ते मध्यम-उत्पन्न गटाला गृहकर्ज उपलब्ध करून देईल. मध्यम ते कमी उत्पन्न असलेल्या गृहखरेदीदारांना स्वस्तातील घरांचे पर्याय शोधून देणे, तसेच पगारदार आणि व्यवसायिकांसाठी बिगर निवासी भारतीय ५ लाखांपासून गृहकर्ज उपलब्ध करून देणे,हे गोदरेज कॅपिटलचे उद्दिष्ट आहे.या कर्जाचा कालावधी ३० वर्षांपर्यंतचा असेल.आवड आणि किंमत याची सांगड घालण्यासोबतच गृहनिर्माण फायनान्स सोल्यूशन्ससह गृहखरेदीदारांमध्ये एक…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे शासकीय योजना व कायदेविषयक जनजागृती मेळावा संपन्न, तालुका विधी सेवा समिती जव्हार व जव्हार तालुका विधिज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजना व कायदेविषयक जनजागृती मेळावा आज जुनी जव्हार ग्रामपंचायतमधील काळीधोंड येथे संपन्न झाला.कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संविधान उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिजित ना.गायकवाड दिवाणी न्यायाधीश जव्हार होते,तर प्रमुख अतिथी म्हणून भाऊसाहेब फटांगरे अप्पर जिल्हाधिकारी पालघर मुख्यालय जव्हार,गणपतराव पिंगळे,उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार, लता धोत्रे तहसीलदार जव्हार, मूयर चव्हाण तहसीलदार मोखाडा, चारूशीला पवार तहसीलदार विक्रमगड,दीपक टिके सहाय्यक प्रकल्प अधिकारी जव्हार,महादेव राऊत वनपरिक्षेत्र अधिकारी,जव्हार मधुकर गवळी सहाय्यक गटविकास अधिकारी, मोखाडा निलेश भोये…
सुधीर धांगडा, तिल्हेर, राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी मेढे फाटा येथे असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयात शेकडो कार्यकर्ते व मित्राच्या उपस्थित त्यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. त्यानंतर मेढे फाटा येथील अनाथ आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.सायवन येथे जिल्हा परिषद शाळेत त्यांच्या हस्ते संगणक वाटप करण्यात आले.या प्रसंगी माजी खा. बळीराम जाधव,यांनी राजेंद्र पाटील यांच्या मागील तीन दशकाच्या कार्याचा गौरव केला. राजेंद्र पाटील हे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर सहकार क्षेत्रात गेल्या…
वसंत भोईर,वाडा महाशिवरात्रीसाठी तिळसेश्वर मंदिर सज्ज वाडा तालुक्यातील प्राचीन प्रौराणिक पांडवकालीन तीलशेश्वर महादेवाचे मंदिर वाडा शहरापासून आठ कि.मी. अंतरावर निसर्गरम्य अशा तिसरा गावी आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.या यात्रेसाठी ठाणे, पालघर जिल्ह्यातील वाडा, शहापूर,विक्रमगड,जव्हार, मोखाडा ,पालघर डहाणू, तलासरी,वसई या तालुक्यातील भाविकांची मोठी गर्दी होते.वाडा, भिवंडी ,शहापूर आगारातून एसटीची खास व्यवस्था करण्यात आली आहे.जीप व रीक्षांची खाजगी वाहतुक मोठ्या प्रमाणात येथे होत असते. मंदिराच्या बाजूलाच असलेल्या वैतरणा नदीच्या डोहात मासे आहेत.कुंडातील मासे भाविकांना शिवरात्र व होळी या दोन दिवशी दिसतात,अशी दंतकथा आहे. या मंदिराचा संबंध भारतातील बारा ज्योतिर्लिंगांमध्ये गणल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिराशी असल्याचा पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ…
वसंत भोईर,वाडा, श्रीकांत पठारे यांची ठाणे जिल्हा मध्य.सह.बँकेच्या सीइओपदी नियुक्ती, दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीइओ ) पदी वाडा येथे राहणारे श्रीकांत विष्णू पठारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकांत पठारे हे मूळ वाडा तालुक्यातील तीळगाव येथील रहिवाशी असून त्यांनी एमएससी एग्रीकल्चर शिक्षण अर्थशास्त्र विषय घेऊन पूर्ण केले आहे.जिल्हा बँकेत त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून बँकेच्या कृषी विभागात उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवला आहे. श्रीकांत पठारे यांना जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नुकतीच बढती देण्यात आली असून एक उच्चशिक्षित,कृषी क्षेत्रातील अभ्यासू व्यक्ती म्हणून त्यांचे ज्ञान व अनुभवाचा फायदा…
संजय लांडगे,वाडा आर्थिक विकास महामंडाळाचा ५० वा वर्धापनदिन उत्साहात साजरा महिला सक्षमीकरण व त्यांच्या विकासासाठी काम करत असलेल्या आर्थिक विकास महामंडळाचा ५० वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरणासाठी पुढकार घेत असलेल्या पुरुषांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. महिला आर्थिक विकास महामंडळ ( माविम ) जिल्हा कार्यालय,पालघर ( महाराष्ट्र शासन अंगिकृत ) माहेर लोक संचालित साधन केंद्र,कंचाड द्वारा काल पाली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत असलेल्या पुरुषांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दर्शना दत्तात्रेय धानवा तसेच प्रमुख अतिथी म्हणून ऍड.सानिका संदेश ढोणे व औद्योगिक प्रशिक्षण संस्था,पालीचे प्राचार्य रोहन…
दीपक मोहिते, प्रतिक्षा संपणार का ? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ; आज सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सूनावणीकडे सर्वांचे लक्ष, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सोक्ष मोक्ष लागण्याची शक्यता आहे.गेल्या साडेचार वर्षांपासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.त्यामुळे आज होणाऱ्या सूनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आरक्षण व प्रभाग रचना, अशा दोन कारणावरून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका गेल्या साडेचार वारंवार पुढे ढकलल्या गेल्या.राज्यशासनाने या काळात महानगरपालिका,महापालिका,नगरपरिषदा,नगर पंचायती,जिल्हा परिषदा, पंचायत समित्या,सहकारी बँका व संस्थावर शासनाने प्रशासक नेमले.प्रशासकीय राजवटीत या सर्व संस्थांचा कारभार नोकरशाहीच्या ताब्यात गेल्यामुळे विकासाची गती मंदावली,भ्रष्टाचारात प्रचंड वाढ झाली,तसेच या काळात लोकांची कामे वेळेवर झाली नाहीत.सर्वत्र बजबजपुरी निर्माण…
निवृत्ती घुसेकर, राजेंद्र पाटील : तळागाळातील जनतेचा प्रामाणिक प्रतिनिधी, दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने पालघर व ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.गेली अनेक वर्षे त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.आज त्यांच्या सायवान या गावी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे हितचिंतक व मित्रांची गर्दी उसळणार आहे. सालाबादप्रमाणे त्यांचा वाढदिवस यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून वर आलेले राजेंद्र पाटील यांनी समाजकारण व राजकारणाची सांगड घालत राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला.त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संचालक मंडळी पण खूप काही शिकू शकलो. संचालकांना कृषी व सहकार क्षेत्राची जवळून ओळख…
बळीराम जाधव माजी खासदार, राजेंद्र पाटील ; सहकार क्षेत्रातील बहूआयामी नेतृत्व – माजी खा.जाधव, ऐन तारुण्यात राजकारणात प्रवेश करणारे दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष व जिवलग मित्र राजेंद्र पाटील यांनी सहकार क्षेत्रात जी बहुमोल कामगिरी केली,त्याला तोड नाही.आज त्यांच्या नेतृत्वाखाली या बँकेने राज्यात मानाचे स्थान मिळवले आहे.समाजातील वंचित घटकांना आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी बँकेच्या माध्यमातून नवनवीन योजना सुरू केल्या.त्यामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील चाळीस ते पन्नास हजार महिलांना रोजगार मिळू लागला.बचत गटांना कमी व्याज दराने अर्थसहाय्य मिळवून देण्याचा निर्णय अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी घेतला,त्यांचा हा निर्णय आदिवासी महिलांचे जीवन पार बदलून टाकणारे ठरले.अनेक…
दीपक मोहिते, वाढदिवस विशेष, राजेंद्र पाटील ; शेतकऱ्याच्या मुलाची उत्तुंग भरारी, कृषी व सहकार क्षेत्रात नावारूपाला आलेले राजेंद्र पाटील यांचा आज वाढदिवस.दरवर्षी त्यांचा हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विरार पूर्वेस ग्रामीण भागातील सायवन या गावात असलेल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळते.त्यामध्ये शेतकरी,आदिवासी मजूर,राजकीय नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते व सहकार क्षेत्रातील मातब्बर मंडळींचा समावेश असतो. पाटील यांचे कुटुंब हे वर्षानुवर्षे सायवन या अतिदुर्गम भागात भातशेती करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत.त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक आवक माफक प्रमाणात असे,पण हे कुटुंब अत्यंत समाधानी होते.कुटुंबातील एक सदस्य राजेंद्र पाटील हे लहानपणापासून उत्साही व हुरहुन्नरी असे व्यक्तिमत्व होते.केवळ आपले नातेवाईक असलेले…
