सुधीर धांगडा, तिल्हेर,
राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा,
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी मेढे फाटा येथे असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयात शेकडो कार्यकर्ते व मित्राच्या उपस्थित त्यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.

त्यानंतर मेढे फाटा येथील अनाथ आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.सायवन येथे जिल्हा परिषद शाळेत त्यांच्या हस्ते संगणक वाटप करण्यात आले.या प्रसंगी माजी खा. बळीराम जाधव,यांनी राजेंद्र पाटील यांच्या मागील तीन दशकाच्या कार्याचा गौरव केला.
राजेंद्र पाटील हे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर सहकार क्षेत्रात गेल्या आठ वर्षात विविध पदावर काम करून आपला ठसा उमटवला.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक ते दोन वेळा अध्यक्ष म्हणून निवडून आले.सध्या ते या बँकेचे अध्यक्ष आहेत.आपल्या या कार्यकालात त्यांनी बँकेच्या माध्यमातून महिला व शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या.आपल्या जिल्ह्यातील कृषी क्षेत्र वाढीला लागावे, शेतकरी सुखी – समाधानी व्हावा, yasathi त्यांनी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. तसेच महिलांसाठीही अनेक योजना त्यांनी आखल्या. महिला बचत गटांना कमी व्याजदराने अर्थसाहाय्य उपलब्ध केले.त्यामुळे जिल्ह्यातील लाखो महिलांना रोजगार उपलब्ध होऊ शकला.त्यांच्या नेतृत्वात आज ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सहकार क्षेत्रात आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय अनेक पुरस्कार मिळाले असून आज सहकार क्षेत्रात ही बँक अग्रेसर आहे.
वसई पूर्व भागातील सामाजिक, धार्मिक, क्रीडा क्षेत्रात राजेंद्र पाटील यांचे मोठे योगदान असून या भागांतील गरीब रुग्णांना ही त्यांनी अनेकदा मदतीचा हात दिला आहे.वाढदिवसानिमित्त पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी मेढे फाटा येथे या भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

