निवृत्ती घुसेकर,
राजेंद्र पाटील : तळागाळातील जनतेचा प्रामाणिक प्रतिनिधी,
दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने पालघर व ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.गेली अनेक वर्षे त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.आज त्यांच्या सायवान या गावी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे हितचिंतक व मित्रांची गर्दी उसळणार आहे.
सालाबादप्रमाणे त्यांचा वाढदिवस यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून वर आलेले राजेंद्र पाटील यांनी समाजकारण व राजकारणाची सांगड घालत राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला.त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संचालक मंडळी पण खूप काही शिकू शकलो. संचालकांना कृषी व सहकार क्षेत्राची जवळून ओळख व्हावी,यासाठी त्यांनी संचालक मंडळाचे देश – परदेशात अभ्यास दौरे आयोजित केले. या अभ्यास दौऱ्यामुळे बँकेचे संचालक व अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा,कृषी क्षेत्रातील समस्या,सहकाराच्या माध्यमातून उद्योगधंदे,आदी ज्वलंत विषयाची माहिती होऊ शकली.गेल्या सात ते आठ वर्षात त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने उत्तुंग अशी भरारी घेत राज्यात प्रथम क्रमांकावर झेप घेतली.महिला बचतगटांना कमी व्याजदराने अर्थसहाय्य करण्याचा त्यांचा निर्णय हा ग्रामीण भागातील आदिवासी महिलांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवणारा ठरला.हजारो आदिवासी कुटुंबे घरगुती उद्योग व्यवसायात स्थिरावली आहेत.व्यवसाय व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे,यासाठी अर्थसहाय्य देण्यासाठी त्यांनी जाचक अटी शिथिल केल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक तरुण – तरुणी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकले.अशा या थोर समाजसेवकाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…

