बळीराम जाधव
माजी खासदार,
राजेंद्र पाटील ; सहकार क्षेत्रातील बहूआयामी नेतृत्व – माजी खा.जाधव,
ऐन तारुण्यात राजकारणात प्रवेश करणारे दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष व जिवलग मित्र राजेंद्र पाटील यांनी सहकार क्षेत्रात जी बहुमोल कामगिरी केली,त्याला तोड नाही.आज त्यांच्या नेतृत्वाखाली या बँकेने राज्यात मानाचे स्थान मिळवले आहे.समाजातील वंचित घटकांना आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी बँकेच्या माध्यमातून नवनवीन योजना सुरू केल्या.त्यामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील चाळीस ते पन्नास हजार महिलांना रोजगार मिळू लागला.बचत गटांना कमी व्याज दराने अर्थसहाय्य मिळवून देण्याचा निर्णय अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी घेतला,त्यांचा हा निर्णय आदिवासी महिलांचे जीवन पार बदलून टाकणारे ठरले.अनेक आदिवासी महिला,या योजनेचा लाभ घेऊन आज स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत.बचत गटाच्या माध्यमातून रोजगार मिळवत,त्या आपल्या पतीच्या बरोबरीने संसाराचा गाडा हाकत आहे.हा जो बदल घडून आला आहे,तो केवळ अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या दूरदर्शीपणामुळे,हे येथे आवर्जून सांगावे लागेल.ग्रामीण भागातील एक तरुण,आज सहकार क्षेत्रात आपल्या जिल्ह्याच्या बँकेचे नांव राज्यस्तरावर नावारूपाला आणतो,ही बाब आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.राज्याच्या सहकार क्षेत्रात क्रमांक एक वर असलेल्या बँकेने गेल्या सात ते आठ वर्षात राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण प्रगती केली.याकाळात बँकेने अनेक आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले.राजेंद्र पाटील हे बँकेच्या दैनंदिन कामकाजात सातत्याने लक्ष घालत असल्यामुळे प्रशासकीय कामकाज अत्यंत सुचारूपणे व प्रभावीरित्या होत आहे.प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी व संचालक मंडळ या दोघांमध्ये समन्वय राखत काम करण्याकडे राजेंद्र पाटील यांचा कटाक्ष असतो.एकेकाळी शेतीच्या मातीत माखणारा शेतकऱ्यांचा हा मुलगा शेती,समाजकारण व राजकारणाला सहकाराची जोड देऊन भूमीपुत्रांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो,अशा या अजातशत्रुला आज त्यांच्या वाढदिवशी उदंड व आरोग्यदायी आयुष्य लाभो,अशी आई जीवदानी चरणी प्रार्थना…

