वसंत भोईर,वाडा,
श्रीकांत पठारे यांची ठाणे जिल्हा मध्य.सह.बँकेच्या सीइओपदी नियुक्ती,
दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीइओ ) पदी वाडा येथे राहणारे श्रीकांत विष्णू पठारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीकांत पठारे हे मूळ वाडा तालुक्यातील तीळगाव येथील रहिवाशी असून त्यांनी एमएससी एग्रीकल्चर शिक्षण अर्थशास्त्र विषय घेऊन पूर्ण केले आहे.जिल्हा बँकेत त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून बँकेच्या कृषी विभागात उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवला आहे.

श्रीकांत पठारे यांना जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नुकतीच बढती देण्यात आली असून एक उच्चशिक्षित,कृषी क्षेत्रातील अभ्यासू व्यक्ती म्हणून त्यांचे ज्ञान व अनुभवाचा फायदा शेतकऱ्यांना व खातेदारांना होईल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या नियुक्तीबद्दल श्रीकांत पठारे यांचे सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

