संजय लांडगे,वाडा
आर्थिक विकास महामंडाळाचा ५० वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
महिला सक्षमीकरण व त्यांच्या विकासासाठी काम करत असलेल्या आर्थिक विकास महामंडळाचा ५० वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरणासाठी पुढकार घेत असलेल्या पुरुषांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

महिला आर्थिक विकास महामंडळ ( माविम ) जिल्हा कार्यालय,पालघर ( महाराष्ट्र शासन अंगिकृत ) माहेर लोक संचालित साधन केंद्र,कंचाड द्वारा काल पाली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत असलेल्या पुरुषांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दर्शना दत्तात्रेय धानवा तसेच प्रमुख अतिथी म्हणून ऍड.सानिका संदेश ढोणे व औद्योगिक प्रशिक्षण संस्था,पालीचे प्राचार्य रोहन चुंबळे इ. मान्यवर उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.पाहुण्याचे स्वागत समारंभा नंतर माविमच्या वर्धापन दिनाची माहिती माहेर लोक संचालित साधन केंद्र, कंचाड व्यवस्थापिका निकिता नितीन भोईर यांनी दिली. त्यानंतर ऍड. सानिका संदेश ढोणे यांनी महिला व पुरुषांना कायद्याविषयी माहिती दिली. तर प्राचार्य रोहन चुंबळे यांनी कॉलेजमध्ये किती प्रकारचे कोर्सेस विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी उपलब्ध आहे, याविषयी सविस्तर माहिती दिली.त्यानंतर टी शर्ट,टोपी व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.माविम कार्यक्रमाचा समारोप माहेर लोक संचालित साधन केंद्रच्या उपजीविका सल्लागार सुस्मित सुनिल पाटील यांनी केला.

