जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे शासकीय योजना व कायदेविषयक जनजागृती मेळावा संपन्न,
तालुका विधी सेवा समिती जव्हार व जव्हार तालुका विधिज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजना व कायदेविषयक जनजागृती मेळावा आज जुनी जव्हार ग्रामपंचायतमधील काळीधोंड येथे संपन्न झाला.कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संविधान उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिजित ना.गायकवाड दिवाणी न्यायाधीश जव्हार होते,तर प्रमुख अतिथी म्हणून भाऊसाहेब फटांगरे अप्पर जिल्हाधिकारी पालघर मुख्यालय जव्हार,गणपतराव पिंगळे,उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार, लता धोत्रे तहसीलदार जव्हार, मूयर चव्हाण तहसीलदार मोखाडा, चारूशीला पवार तहसीलदार विक्रमगड,दीपक टिके सहाय्यक प्रकल्प अधिकारी जव्हार,महादेव राऊत वनपरिक्षेत्र अधिकारी,जव्हार मधुकर गवळी सहाय्यक गटविकास अधिकारी, मोखाडा निलेश भोये सरपंच जुनीजव्हार,श्रावण खरपडे माजी जि.प.सदस्य,तसेच डॉ.किरण पाटील,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी जामसर, जयराम हरी आढळ तालुका कृषी अधिकारी जव्हार, उज्वला कोकणे जिल्हा अग्रणी बँक प्रतिनिधी,विधीज्ञ संघटनेचे पदाधिकारी व सदस्य इ.मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा काळीधोंड येथील विद्यार्थ्यांच्या स्वागतगिताने झाली.त्यानंतर जुनी जव्हार ग्रामपंचायत अधिकारी संदीप घेगडे यांच्या हस्ते झाडांची रोपे देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमात महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद पालघर आणि पंचायत समिती जव्हार यांच्या वतीने ज्यूडो-कराटे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.तसेच,प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ( टप्पा २ ) अंतर्गत मंजुरी आदेशांचे वितरण,व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ९०% अनुदानित शेळी वाटप दिव्यांग लाभार्थ्यांना,तसेच
आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत जेजुरी महिला बचत गट आकरे व पत्रावळी मशीन योजनेचे धनादेशचे वाटप व
त्यानंतर शासकीय योजनांसाठी विभागीय स्टॉल्सचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या मेळाव्यात पंचायत समिती जव्हार,मोखाडा,विक्रमगड, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय जव्हार, मोखाडा,विक्रमगड,कृषी विभाग,आरोग्य विभाग, आदिवासी विकास विभाग, वनविभाग,दिवाणी न्यायालय कार्यालय आणि जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी यांनी स्वतःच्या विभागाच्या विविध योजनांची माहिती देत उपस्थित नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले.यानंतर अप्पर जिल्हाधिकारी पालघर भाऊसाहेब फटांगरे यांनी लाभार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश अभिजीत गायकवाड यांनी ” शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जनजागृती महत्त्वाची,” असल्याचे नमूद करून तालुका विधी सेवा समितीच्या वतीने या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले.मेळाव्याच्या शेवटी वनविभागाच्या वतीने नागरिकांना झाडांची रोपे वाटप करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी,दिवाणी न्यायालय कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.जयेश लोखंडे व ऍड.अनिता फलटणकर यांनी केले,तसेच त्यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली.

