- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, अरे हाssड… मी गंगाजल पिणार नाही.. दोन दिवसापूर्वी राज ठाकरेंनी गंगाजलाची उडवलेली खिल्ली व केलेले हातवारे हे कोणाच्याच मनाला पटलेले नाही.गंगाजल हे किती शुद्ध आहे,हा मुद्दा महत्वाचा नाही. पण पुराण काळापासून वाहणाऱ्या गंगा नदीशी तुमच्या आमच्या धार्मिक भावना निगडीत आहेत.या नदीकिनारी राहणारा स्थानिक नागरिक त्या पाण्यावरच आपली तहान भागवत असतो,हे आपण लक्षात घ्यायला हवे होते.लोकांच्या आस्था या गंगाजलाशी वर्षानुवर्षे जोडल्या गेल्या आहेत.ते तुम्हाला कदापि नाकारता येणार नाही. तुमच्या पक्षाचे काही पदाधिकारी पक्षाचा महत्त्वाचा कार्यक्रम बुडवून कुंभमेळ्याला गेले होते.त्यांना तूम्ही जाब विचारायला हवा होता. त्यापैकी एका पदाधिकाऱ्यांने तुमच्यासाठी गंगाजल आणले आणि त्याला तूम्ही हाssड म्हणत ते गंगाजल पिणार नाही,अशी…
दीपक मोहिते, भितीने व्याकुळ झालेल्या एका बापाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, सध्या राज्यात जे काही चालले आहे,ते पाहून व्यथित झालेल्या एका बापाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून माझ्या मुलाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,अशी गळ घातली आहे. ते आपल्या पत्रात काय म्हणतात ते पहा,” माझ्या अकरा वर्षाच्या मुलाने मला काल प्रश्न विचारला ” आप्पा मी मोठा झाल्यावर कलेक्टर होऊ का ? की त्यापेक्षाही मोठा अधिकारी ? त्याच्या या प्रश्नाने मी बुचकळ्यात पडलो.कारण बीडची एक ना अनेक प्रकरणे माझ्या डोळ्यासमोर तरळत होती.वाल्मिक कराड,त्याची खतरनाक टोळी,खोक्या,धनंजय मुंडे,सुरेश धस, मनात विचार आला की त्याला आयपीएस किंवा आयएएस अधिकारी बनवायचं,आणि असल्या फालतू व मानवजातीला काळिमा फासणाऱ्या…
शुभम सावंत,विरार, विवा महाविद्यालयात “अॅक्युप्रेशर अँड अॅक्यूपंक्चर,” व्याख्यान संपन्न, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विवा महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्ष आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने “अॅक्युप्रेशर अँड अॅक्यूपंक्चर” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.शैला सावंत, विवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी.श.अडिगल,उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे आणि उपप्राचार्या डॉ.दीपा वर्मा, महिला सक्षमीकरण कक्षाच्या प्रमुख प्राक्तना कोरे उपस्थित होते. महिला सक्षमीकरण कक्ष आणि आयक्यूएसी यांच्या पुढाकाराने आयोजित या सत्राचे उद्दीष्ट अॅक्युप्रेशर आणि अॅक्यूपंक्चरच्या उपचारात्मक फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे हे होते. शरीरातील उर्जेचा प्रवाह संतुलित ठेवण्यासाठी दबाव आणि सुया वापरणाऱ्या या प्राचीन चीनी उपचारपद्धतींचे महत्त्व या सत्रात स्पष्ट…
नाशिक प्रतिनिधी, सरकारने साडेचार कोटी कामगारांना वाऱ्यावर सोडले, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील साडेचार कोटी संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. कामगार खात्यासाठी फक्त १७१ कोटीची तरतूद केली आहे. राज्य सरकारने उद्योग वाढीसाठी नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.या धोरणानुसार चाळीस लाख कोटी रु.ची गुंतवणूक तसेच ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. यासाठी उत्पादन तसे निर्यात प्रोत्साहन धोरणाची अंमलबजावणी ही करण्यात येणार आहे.अर्थात त्यांची ही घोषणा पूर्वीच्या घोषणांप्रमाणेच बोलाचाच भात आणि बोलाचीच कडे ठरण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात उद्योग विभागासाठी १०२१ कोटीची तर कामगार विभागाला फक्त १७१ कोटीची तरतूद केली…
संजय लांडगे,वाडा थकीत मजुरीसाठी श्रमजीवी संघटनेचा वाडा तहसील कार्यालयावर मोर्चा, आपल्या देशातील प्रत्येक गरिबाच्या हाताला काम मिळावे,म्हणून २००५ मध्ये नरेगा व नंतर नाव बदलून २००९ मध्ये मनरेगा योजना सुरू करण्यात आली.या योजनेतील कामगारांची थकीत मजुरीसाठी श्रमजीवी संघानेचा वाडा तहसील कार्यालयवर मोर्चा आपल्या देशामध्ये प्रत्येक गरिबाच्या हाताला काम मिळावे म्हणून २००५ मध्ये नरेगा व नंतर नाव बदलून २००९ मध्ये मनरेगा योजना सुरू करण्यात आली.मात्र या योजनेकडे शासन व प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष झाल्यामुळे हजारो नागरिकांना हक्काच्या रोजगारापासून वंचित रहावे लागत आहे.वाडा तालुका हा ग्रामीण तथा आदिवासी बहुल तालुका असून मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत कामे करतात.…
दीपक मोहिते, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता, राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी ” मल्हार सर्टिफिकेट,” या नावाने नवीन उपक्रम सुरु करण्याची घोषणा केली आहे.या निर्णयामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याअंतर्गत राज्यभरात झटका मटण विकणाऱ्या दुकानांची नोंदणी केली करण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र मिळणारी दुकाने केवळ हिंदू समुदायातील लोक चालवतील,असं त्यामध्ये म्हंटलं आहे. नितेश राणे यांनी आपल्या सोशल मिडीयावर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, ” आज आज आम्ही महाराष्ट्रातील हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम ( https://malharcertification.com ) या निमित्ताने सुरू केलं आहे.मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटणाची दुकाने…
संजय नेवे,विक्रमगड, ” बिल ऑफ लँडिंग,” विधेयक देशाला फायदेशीर, देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदर प्रकल्पाला गती देणाऱ्या आणि भारताच्या सागरी व्यापाराला नवी दिशा देणाऱ्या ” बिल ऑफ लॅडिंग,” विधेयकाचे देशभरात स्वागत करण्यात येत आहे.पालघरचे खा.डॉ.हेमंत सवरा यांनीही हे विधेयक आपल्या जिल्ह्याच्या विकासाला गती देईल,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या महत्त्वपूर्ण विधेयकामुळे वाढवण बंदर, भारतातील सर्वात मोठे बंदर असेलला प्रकल्प आणखी सक्षम होणार आहे.तसेच पालघर जिल्ह्याचा औद्योगिक आणि आर्थिक विकास अधिक वेगाने पुढे जाईल.फक्त पालघरच नव्हे,तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठा फायदा होणार आहे. हे एक कायदेशीर दस्तऐवज असून,मालवाहतूक व्यवहारासाठी अत्यावश्यक असे एक विधेयक आहे.मालवाहतूक कराराचा पुरावा,माल मिळाल्याची पावती,वस्तूंच्या मालकी हक्काचा…
संजय नेवे,विक्रमगड शिक्षक समिती,विक्रमगड तालुकाध्यक्षपदी सुनील अधिकारी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पालघर यांची सभा नुकतीच आश्रमशाळा माण येथे पार पडली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पालघर जिल्हाध्यक्ष राजू महाले यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा घेण्यात आली.या सभेत विक्रमगड शाखेच्या अध्यक्षपदी सुनील अधिकारी यांची तर सचिव पदी रविंद्र जायभाये व जिल्हा सदस्यपदी अजित भोईर यांची निवड करण्यात आली. सुनील अधिकारी यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
संजय नेवे,विक्रमगड विक्रमगड येथे पी.एम.किसान सन्मान योजना शिबिर संपन्न, महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी कार्यालय विक्रमगडतर्फे पी.एम.किसान सन्मान योजना शिबिर उत्साहात संपन्न झाले. संत रोहिदास सभागृह,रोहिदास नगर, विक्रमगड येथे नुकतेच या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरास विक्रमगड तहसीलदार चारुशीला पवार व विक्रमगड पंचायत समिती गटविकास अधिकारी मिलिंद जगदाळे यांनी भेट दिली. या शिबिरात प्रलंबित ई-केवायसी,एनपीसीएल मॅपिंग,लँड सिडींग,वनपट्टेधारक व कातकरी समाज बांधव यांना लाभ,ऍग्रीस्टॅक नोंदणी,आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करणे,याचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. येत्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचे हप्ते मिळवण्याकरता ऍग्रीस्टॅक नोंदणी करणे आवश्यक आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला.
वसंत भोईर,वाडा अंभई/आमगाव ग्रामस्थांनी घातला पंचायत समिती कार्यालयाला घेराव, तालुक्यातील अंभई ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक आणि वाडा पंचायत समितीचे बांधकाम, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी केलेला भ्रष्टाचार पुराव्यासह सहनिर्देशनास आणूनही कारवाईस टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांनी गेल्या बुधवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. सहाव्या दिवशीही या उपोषणाची दखल न घेतल्याने आज अंभई आमगाव ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयाला घेराव घालून अधिकाऱ्यांना जाब विचारला. या ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी व अधिकारी यांनी वस्तूंची खरेदी करताना अनावश्यक अंदाजपत्रक, कामाचा सुमार दर्जा,छुप्या मार्गाने निविदा काढून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देणे,असे विविध आरोप करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी उपोषण…
