संजय नेवे,विक्रमगड
शिक्षक समिती,विक्रमगड तालुकाध्यक्षपदी सुनील अधिकारी,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पालघर यांची सभा नुकतीच आश्रमशाळा माण येथे पार पडली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पालघर जिल्हाध्यक्ष राजू महाले यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा घेण्यात आली.या सभेत विक्रमगड शाखेच्या अध्यक्षपदी सुनील अधिकारी यांची तर सचिव पदी रविंद्र जायभाये व जिल्हा सदस्यपदी अजित भोईर यांची निवड करण्यात आली.
सुनील अधिकारी यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

