संजय नेवे,विक्रमगड,
” बिल ऑफ लँडिंग,” विधेयक देशाला फायदेशीर,
देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदर प्रकल्पाला गती देणाऱ्या आणि भारताच्या सागरी व्यापाराला नवी दिशा देणाऱ्या ” बिल ऑफ लॅडिंग,” विधेयकाचे देशभरात स्वागत करण्यात येत आहे.पालघरचे खा.डॉ.हेमंत सवरा यांनीही हे विधेयक आपल्या जिल्ह्याच्या विकासाला गती देईल,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या महत्त्वपूर्ण विधेयकामुळे वाढवण बंदर, भारतातील सर्वात मोठे बंदर असेलला प्रकल्प आणखी सक्षम होणार आहे.तसेच पालघर जिल्ह्याचा औद्योगिक आणि आर्थिक विकास अधिक वेगाने पुढे जाईल.फक्त पालघरच नव्हे,तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठा फायदा होणार आहे.
हे एक कायदेशीर दस्तऐवज असून,मालवाहतूक व्यवहारासाठी अत्यावश्यक असे एक विधेयक आहे.मालवाहतूक कराराचा पुरावा,माल मिळाल्याची पावती,वस्तूंच्या मालकी हक्काचा दस्तऐवज, शिपमेंटचा अधिकृत पुरावा इ. मुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग व्यवहार,अधिक सुकर करण्यास मदत होणार आहे.
या विधेयकामुळे भारतीय सागरी वाहतुकीला जागतिक दर्जाची प्रणाली मिळेल आणि बंदर व्यवसायाला गती मिळेल आणि व्यापार अधिक पारदर्शक होईल.
महाराष्ट्राच्या आणि पालघर जिल्ह्याच्या प्रगतीला गती देणाऱ्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत पालघर लोकसभेचे खा.डॉ हेमंत सावरा केले आहे.

