संजय लांडगे,वाडा
थकीत मजुरीसाठी श्रमजीवी संघटनेचा वाडा तहसील कार्यालयावर मोर्चा,
आपल्या देशातील प्रत्येक गरिबाच्या हाताला काम मिळावे,म्हणून २००५ मध्ये नरेगा व नंतर नाव बदलून २००९ मध्ये मनरेगा योजना सुरू करण्यात आली.या योजनेतील कामगारांची थकीत मजुरीसाठी श्रमजीवी संघानेचा वाडा तहसील कार्यालयवर मोर्चा
आपल्या देशामध्ये प्रत्येक गरिबाच्या हाताला काम मिळावे म्हणून २००५ मध्ये नरेगा व नंतर नाव बदलून २००९ मध्ये मनरेगा योजना सुरू करण्यात आली.मात्र या योजनेकडे शासन व प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष झाल्यामुळे हजारो नागरिकांना हक्काच्या रोजगारापासून वंचित रहावे लागत आहे.वाडा तालुका हा ग्रामीण तथा आदिवासी बहुल तालुका असून मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत कामे करतात.
मात्र या तालुक्यातील
मजुरांची मजुरी डिसे. महिन्यापासून ९ कोटी २४ लाख ५८ हजार ९०५ रु. एवढी मजूरी थकीत आहे. शिमगा ( होळी ) सण दोन दिवसावर आला असतांना या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.पोटाची खळगी भरायची कशी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.होळी सण साजरा करण्याच्या तयारीत असताना मजुरांना केलेल्या कामाच्या मजुरीसाठी उन्हा, तान्हात मोर्चा काढावा लागत आहे,ही एकप्रकारची शोकांतिकाच आहे.
वाडा तालुक्यातील ६ हजार मजुरांची थकीत मजुरी तात्काळ देण्यात यावी,
केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या हमीनुसार १०० दिवस व राज्य शासनाच्या हमी प्रमाणे २६५ दिवस असे ३६५ दिवस काम उपलब्ध करून देण्यात यावे,अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
गावपाड्यांना रस्ते जोडण्याचे काम मनरेगा योजनेतून होत असतात.नव्याने रस्त्यांची कामे करण्यासाठी स्थगिती देण्यात आल्यामुळे अनेक गावपाड्यातील असंख्य मजूर रोजगारापासून वंचित आहेत. प्रशासनाने तात्काळ रस्त्यांची कामे सुरू करावी,
ज्या मजुरांनी कामाची मागणी केली आहे,अशा मजुरांना बेरोजगार भत्ता देण्यात यावा.
मंजूर वनपट्ट्यावर बांध बंदिस्तीचे काम तात्काळ देण्यात यावे.अशा मागण्या घेऊन श्रामजीवी संघटनेचे वाडा तालुका अध्यक्ष भरत जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी सचिव सुरज दळवी,संपर्क प्रमुख रफिक चौधरी,जिल्हा महिला ठिणगी उपप्रमुख रेखा पऱ्हाड, सचिव् आदेश वाघ,चंदर गवते सुजाता पारधी यांच्यासह शेकडो महिला मजूर उपस्थित होत्या.या योजनेकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हजारो नागरिकांना हक्काच्या रोजगारापासून वंचित रहावे लागत आहे.वाडा तालुका हा ग्रामीण तथा आदिवासी बहुल तालुका असून मोठ्या संख्येने नागरिक महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत काम करत असतात.

