संजय नेवे,विक्रमगड
विक्रमगड येथे पी.एम.किसान सन्मान योजना शिबिर संपन्न,
महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी कार्यालय विक्रमगडतर्फे पी.एम.किसान सन्मान योजना शिबिर उत्साहात संपन्न झाले.
संत रोहिदास सभागृह,रोहिदास नगर, विक्रमगड येथे नुकतेच या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरास विक्रमगड तहसीलदार चारुशीला पवार व विक्रमगड पंचायत समिती गटविकास अधिकारी मिलिंद जगदाळे यांनी भेट दिली.
या शिबिरात प्रलंबित ई-केवायसी,एनपीसीएल मॅपिंग,लँड सिडींग,वनपट्टेधारक व कातकरी समाज बांधव यांना लाभ,ऍग्रीस्टॅक नोंदणी,आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करणे,याचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
येत्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचे हप्ते मिळवण्याकरता ऍग्रीस्टॅक नोंदणी करणे आवश्यक आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला.

