- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” शिक्षणाच्या आयचा घो,” शिक्षण विभागाचा ” पायपोस त्यांच्याच पायात नाही,”… राज्यसरकारच्या शिक्षण विभागाची अवस्था ” असुन अडचण,नसून खोळंबा,अशी झाली असुन या विभागात सुधारणा करण्यासाठी आजवर एकाही शिक्षणमंत्र्याने जाणीवपुर्वक प्रयत्न केले नाहीत.या विभागाच्या दिशाहीन कारभारामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे सध्या तीन तेरा वाजले आहेत.भविष्यातही त्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता नाही. शिक्षणाचा अधिकार कायदा झाला,पण शैक्षणिक संस्थानी त्याचा पार चोळा मोळा करून टाकला.त्यांना या कामी निष्काळजी असलेल्या शिक्षण विभागाचा कायम हातभार लागला. काल,विधानसभेत भाजपचे मुंबईतील आ.योगेश सागर यांनी शिक्षण विभागातील अनागोंदी कारभारावर टीका करत शिक्षणमंत्र्यांना देखील खडे बोल सुनावले.यावेळी त्यांनी शालेय संस्थाकडून शैक्षणिक शुल्कामध्ये करण्यात येणाऱ्या शुल्कवाढीवर अंकुश लावण्यासंदर्भात त्यांनी मुद्दा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” चड्डी-बनियन गँग ; सरकारची अब्रु चव्हाट्यावर, काल विरोधकांनी शिंदे गटाच्या आमदारांच्या उच्छादावर सभागृह व सभागृहाबाहेर ज्या पद्धतीने हल्ला चढवला,त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही बोलती बंद झाली.आ.आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत केलेल्या घणाघाती भाषणात मंत्रीमंडळातील चड्डी-बनियन गँगवरून फडणवीस सरकारची लक्तरे अक्षरशः वेशीला टांगली.त्यामुळे महायुतीच्या अनेक आमदारांच्या अंगाची लाही लाही झाली.शिंदे गटाचे आ.निलेश राणे यांनी तर भर सभागृहात अनावश्यक केकाटणेच सुरू केले होते.पण त्यांच्या केकाटण्याची फारशी कोणी दखल घेतली नाही.या सर्व घडामोडीमुळे आदित्य ठाकरे यांचा तीर सत्ताधारी पक्षाच्या वर्मी बसल्याचे स्पष्ट झाले.या सर्व घडामोडीनंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर चड्डी- बनियन घालून आगळे वेगळे आंदोलन केले.या सर्व घडामोडीमुळे महायुती…
दीपक मोहिते, समाधानाची बाब, वसई-विरारच्या प्रलंबित विकासकामाबाबत सरकार सकारात्मक, भाजपच्या दोन्ही आमदारांनी आपल्या वसई व नालासोपारा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा चालवला आहे.नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात या दोघांनी तारांकित व लक्षवेधी,अशी आयुधे वापरत तालुक्याच्या अनेक समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तोंडावर ज्या वेगाने या दोघांनी प्रलंबित विकासकामांचा पाठपुरावा चालवला आहे,त्याचा त्यांच्या पक्षाला या निवडणुकीत फायदा होऊ शकतो.काल आ.स्नेहा दुबे पंडित,आ.राजन नाईक व खा.डॉ.हेमंत सवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन प्रलंबित विकासकामासंदर्भात सविस्तर चर्चा केली.सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत जि.प.च्या ११६ प्राथमिक शाळा,३ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १२ उपकेंद्रे, महानगरपालिकेकडे हस्तांतर करणे, महानगरपालिका…
*दीपक मोहिते,* कौन बनेगा सिकंदर ? *विरार पूर्व,* *१ ) मनवेलपाडा,* *२ ) संतनगर,* *३ ) कारगिलनगर,* *४ ) साईनाथ नगर,* *५ ) सहकार नगर,* *६ ) चंदनसार,* *७ ) कोपरी,* *८ ) मांडवी,* *विरार पश्चिम:-* *१ ) विराटनगर,* *२ ) एम.बी.इस्टेट,* *३ ) विवा महाविद्यालय,* *४ ) स्टार बाझार परिसर,* *५ ) ग्लोबल सिटी,* *६ ) चिखलडोंगरे / नारिंगी,* *७ ) गोकुल टाऊनशिप,* *८ ) बोळींज,* *९ ) आगाशी /पुरापाडा/ कोल्हापूर,* *१० ) नंदाखाल / नानभाट,* *११ ) उमराळे / करमाळे,* *नालासोपारा पूर्व :-* *१ ) मोरेगाव,* *२ ) निळे गांव,* *३ ) तुळींज / डोंगरी,* *४ )…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अत्यंत मागासलेले झारखंड राज्य आणि वास्तवापासून फारकत घेतलेला मुजोर खा.निशिकांत दुबे, झारखंडचा खासदार निशिकांत दुबे याने आपल्या राज्यातील उद्योग व नैसर्गिक संसाधनाविषयी ( गौण खनिज,वनसंपदा ) शेखी मिरवत,तुमच्या महाराष्ट्रात काय आहे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.वास्तविक दुबे यांच्या या प्रश्नाला उत्तर देणे,मनाला पटणारं नाही,पण ते द्यायलाच हवे,कारण ” म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकवतो,” या म्हणीनुसार त्याच्याशी वागायला हवे..… खा.निशिकांत दुबे याने अत्यंत अशिक्षित माणसासारखे वक्तव्य करून स्वतःचे हसं करून घेतले आहे.तुमच्या महाराष्ट्रात काय आहे ? असा प्रश्न विचारण्यापूर्वी खासदार असलेल्या दुबे याने देशाच्या विविध राज्यातून गोळा होणाऱ्या जीएसटी रकमेच्या आकडेवारीवर एक नजर टाकायला…
दीपक मोहिते, पुनर्विकास मार्गदर्शन शिबीर ; जनजागृतीसाठी एक चांगला उपक्रम, वसई विरार भागात पुनर्विकासाचे आता वारे वाहू लागले आहेत,याविषयी जनतेला माहिती मिळावी,यासाठी पुनर्विकास समितीतर्फे ” स्वयं:पुनर्विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.वसईत होणाऱ्या या मार्गदर्शन शिबिराच्या निमंत्रकपदी वसईच्या आ.स्नेहा दुबे या आहेत. वसई व नालासोपारा या दोन शहरात गेल्या काही वर्षात प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत.नालासोपारा शहरातील ४१ अनधिकृत इमारतीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.समाजकंटकांनी आरक्षित जमिनीवर या इमारती उभारल्या व त्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महानगरपालिकेने दोन महिन्यापूर्वी जमिनदोस्त केल्या.त्यामुळे सुमारे ४०० कुटुंबे बेघर झाली आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर आ.राजन नाईक व आ.स्नेहा दुबे पंडित यांनी या प्रकरणी पुढाकार…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” एकनाथ शिंदे व अजित पवार,या दोघांना खूप काही सहन करावे लागणार…. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर त्यांना एकनाथ शिंदे व अजित पवार गटाची फारशी आता गरज उरलेली नाही.त्यामुळे या दोन्ही गटाला दिल्ली दरबारी मिळणारा मानमरातब सध्या उतरणीला लागला आहे.आपल्याला हल्ली सतत डावलण्यात येत असल्यामुळे एकनाथ शिंदे हे आपल्या गावी शेतीत रमत असतात तर अजित पवार हे मुकाट्याने ” तोंड बांधून,बुक्क्याचा मार,” सहन करत आहेत.या दोघांना सत्तेशिवाय श्वास घेता येत नाही.भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून ते नाराज आहेत,पण दिल्लीतील नेत्यासमोर आपले काही चालणार नाही,हे माहीत असल्यामुळे त्यांनी स्वस्थ बसणे,यामध्येच आपले…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज यांचे वक्तव्य ; शिवसेना व मनसेमध्ये संभ्रमाचे वातावरण, उद्धव व राज हे ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यानंतर शिवसेना व मनसे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकत्र येऊन लढवतील,असे अंदाज व्यक्त झाले होते.पण काल राज ठाकरे यांनी युतीविषयी संभ्रम निर्माण होईल,असे वक्तव्य केल्यामुळे चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.जाहीर सभा पार पडल्यानंतर त्यांनी मनसेच्या पदाधिकारी व सैनिकांनी युतीबाबत बाहेर चर्चा करू नये,असे आदेश दिले होते.त्यानंतर काल त्यांनी ती जाहीर सभा केवळ मराठी मुद्द्यासाठी होती.युतीसंदर्भात नोव्हे.डिसें.नंतर निर्णय घेऊ असे स्पष्ट केले आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांच्या भुवया वर गेल्या आहेत.यापूर्वीही राज ठाकरे यांनी आपली भूमिका वारंवार बदलल्या आहेत.त्या पार्श्वभूमीवर…
वसंत भोईर वाडा, शेतकऱ्यांचे खासदारांना साकडे, तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील टायर रिसायकलिंग कंपन्या चिंचघरपाडा, मुसारणे( पाटील पाडा ) या गावातील परंपरागत वहिवाटीच्या नैसर्गिक नाल्यात टायर कंपनी मालकाने संरक्षक भिंत बांधली आहे.त्यामुळे नाल्याचे संपूर्ण पाणी नजीकच्या भातशेतीत गेल्यामुळे पेरणी केलेले संपूर्ण पीक वाया गेले आहे . या संदर्भात निवेदन देऊनही कार्यवाहीसाठी चालढकल होत होती.अखेर येथील शेतकऱ्यांनी पालघरचे खा.डॉ. हेमंत सावरा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. परंपरागत चालत आलेला नैसर्गिक नाला बंद केल्यामुळे या दोन गावातील शेतकऱ्यांचे २५ ते ३० हेक्टर क्षेत्र बाधित होऊन येथील संपूर्ण भात शेती नापीक होणार असल्याचे खा. डाॅ.हेमंत सवरा यांच्या निदर्शनास आणले.…
जव्हार प्रतिनिधी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यांत्रिक भातशेतीच्या दिशेने वाटचाल, जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आदिवासी असले तरी बदलत्या हवामान परिस्थितीशी जुळवून घेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये सकारात्मक बदल घडवत आहेत.कृषी विज्ञान केंद्र,कोसबाड यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील शेतकरी आता भातशेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत. भात लागवडीसाठी आधुनिक यंत्रणांचा वापर, भात ट्रे रोपवाटिका,मॅट पद्धत, राबविरहित लागवड,टोकन पद्धत,सगुणा तंत्रज्ञान,अशा विविध उपाय करून शेतकऱ्यांनी शेतीची दिशा बदलली आहे.२०२५-२६ मध्ये भात लागवडीसाठी यांत्रिकीकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. गेल्या सहा वर्षांपासून कृषी विज्ञान केंद्र कोसबाडचे शास्त्रज्ञ भरत कुशारे हे यंत्राद्वारे भातलागवड,ट्रे रोपवाटिका व यांत्रिक पद्धतीने शेती या संकल्पनांचा प्रचार व प्रसार करत आहेत.त्यांच्या प्रयत्नातून कोसबाड,जव्हार…
