दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अत्यंत मागासलेले झारखंड राज्य आणि वास्तवापासून फारकत घेतलेला मुजोर खा.निशिकांत दुबे,
झारखंडचा खासदार निशिकांत दुबे याने आपल्या राज्यातील उद्योग व नैसर्गिक संसाधनाविषयी ( गौण खनिज,वनसंपदा ) शेखी मिरवत,तुमच्या महाराष्ट्रात काय आहे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.वास्तविक दुबे यांच्या या प्रश्नाला उत्तर देणे,मनाला पटणारं नाही,पण ते द्यायलाच हवे,कारण ” म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकवतो,” या म्हणीनुसार त्याच्याशी वागायला हवे..…
खा.निशिकांत दुबे याने अत्यंत अशिक्षित माणसासारखे वक्तव्य करून स्वतःचे हसं करून घेतले आहे.तुमच्या महाराष्ट्रात काय आहे ? असा प्रश्न विचारण्यापूर्वी खासदार असलेल्या दुबे याने देशाच्या विविध राज्यातून गोळा होणाऱ्या जीएसटी रकमेच्या आकडेवारीवर एक नजर टाकायला हवी होती.मग त्यांना कळले असते की महाराष्ट्राच्या तुलनेत आपल्या झारखंडचे स्थान कुठे आहे ते..
त्यांच्या अविकसित झारखंड राज्य आर्थिक क्षेत्रात कोणत्या क्रमांकावर आहे,चला पाहूया..
गेल्या महिन्यात देशाच्या विविध राज्यातून एकूण १.८४ लाख कोटी रु.जीएसटीचे संकलन झाले.त्यामध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ३०,५५३ कोटी,कर्नाटक – १३,४०९ कोटी,गुजरात – ११,०४० कोटी, तामिळनाडू – १०,६७६ कोटी,हरियाणा – ९,९५९ कोटी,उत्तर प्रदेश – ९,२४८ कोटी,दिल्ली – ५,६१० कोटी, पश्चिम बंगाल – ५,५५१ कोटी,तेलंगना – ५,५११ कोटी,ओडिशा – ५,०७९ कोटी राजस्थान – ४,५२२ कोटी,मध्यप्रदेश – ३,३८९ कोटी,आंध्र प्रदेश – ३,६३४ कोटी,छत्तीसगड – ३,२७६ कोटी,झारखंड – ३,०८६ कोटी,केरळ – २,८५६ कोटी,पंजाब – २,२३२ कोटी, त्यानंतर १८ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेश,ही सर्व १ ते २ हजार कोटीच्या आत आहेत.आपले झारखंड राज्य १५ क्रमांकावर असताना हा निशिकांत दुबे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखे आपली छाती ५६ इंचाची असल्याची फुशारकी मारत आहे.असे लोकप्रतिनिधी आपण देशाच्या उच्च सभागृहात पाठवतो,हे एकप्रकारचे दुर्देवच म्हणावे लागेल.अशा या निशिकांत दुबे याचा मुंबईत दीड कोटींचा फ्लॅट आहे.तरीही या माणसाला महाराष्ट्राचे वावडे आहे.

