Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” लाज वाटते,” विधानसभेचा दर्जा दिवसेंदीवस खालावत चाललाय…. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे काल सुप वाजले.यंदाचे हे अधिवेशन पंधरवडाभर चालले,या अधिवेशनात फारसा गोंधळ न झाल्यामुळे कामकाज तहकूब करण्याची पाळी विधानसभा अध्यक्षावर आली नाही.ही समाधानाची बाब असली तरी प्रत्यक्षात जनहिताची कामे किती झाली,याविषयीचा लेखा – जोगा मांडायलाच हवा.या अधिवेशनात आरोप – प्रत्यारोप,अर्वाच्च भाषेत टीका – टिप्पणी,टोमणे व अपशब्दांचा सर्रास वापर,असे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळाले. गेल्या काही वर्षात जवळपास प्रत्येक अधिवेशनात आमदारांचा आक्रस्ताळेपणा,खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे,एकमेकांच्या अंगावर धावून जाणे,असे प्रकार वाढीला लागले आहेत.पूर्वी सभागृहात अनेक दिग्गज नेत्यांची अभ्यासपूर्ण भाषणे होत असत.सत्ताधारी व विरोधक या दोघांमध्ये वादविवाद व लोकांच्या प्रश्नावर आमने…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जिल्ह्यातील २४ शिक्षकांची राज्यस्तरीय  प्रशिक्षणासाठी निवड, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र राज्य,पुणे आणि ” शांतिलाल मुथ्था फाउंडेशन, ” पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मूल्यवर्धन राज्यस्तरीय प्रशिक्षण ३.०’ कार्यक्रम वाघोली, पुणे येथे नुकताच यशस्वीरीत्या पार पडला. या प्रशिक्षणाचा उद्देश राज्यातील शाळांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षणाचा पाया मजबूत करणे हा होता. या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणामध्ये संचालक राहुल रेखावार ( भा. प्र. से. ), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जैन संघटना,शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संचालक शांतिलाल मुथ्था,कार्यकारी सहसंपादक समता विभाग प्रमुख वर्षाराणी भोपळे, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे प्रमुख मीनल दशपुत्रे,अशोक विद्याधर,गोपाल शुक्ल, मास्टर ट्रेनर बाळासाहेब ठोंबरे, सचिन वालुंजकर, सुहास…

Read More

सुरेश काटे,तलासरी तलासरी तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्रांना टाळे, पालघर जिल्ह्यात युरिया खत आणि भात बियाण्यांच्या अनियमित आणि अन्यायकारक विक्री विरोधात शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता, तलासरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्याही तक्रारी करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत जिल्हा कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांवर करडी नजर ठेवली व शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या तलासरी तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्रांवर थेट कारवाई करत त्यांचे परवाने रद्द केले आहेत. तलासरी तालुक्यातील त्रिशा कृषी सेवा केंद्र आणि योगिता कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. या विक्रेत्यांकडून युरिया खतासाठी सरकारने निश्चित केलेल्या २६६ रु.पेक्षा अधिक म्हणजेच ३०० ते…

Read More

वसंत भोईर,वाडा डाळिंबाला सोन्याचा भाव, मागणीमध्ये मात्र घट नाही… डाळिंब शेती फायदेशीर व्यवसाय असून त्यातून नफा मिळवण्यासाठी योग्य नियोजन, व्यवस्थापन आणि परिश्रमाची आवश्यकता असते.पालघर जिल्ह्यात डाळिंबाचे उत्पन्न नाहीच्या बरोबर आहे.आयात झालेल्या फळांच्या बळावरच आपली मदार असते.त्यातही यंदा पावसामुळे डाळिंबाचे क्षेत्र कमी झाले आहे.त्यामुळे यंदा डाळिंबाच्या दाण्यांना मोत्याचा भाव आला आहे. डाळिंब हे खडकाल व माळ रानावर येणारे पीक आहे. इतर पिकांप्रमाणे या पिकाला जास्त प्रमाणात पाणी लागत नाही.कमी पाण्याचे हे पीक असले तरी अतिवृष्टीत या पिकाची प्रचंड मोठ्या प्रमाणावर नासाडी झाल्यामुळे यंदा भाव वाढले आहेत. डाळिंबाची मागणी सर्वत्र प्रचंड असते.वाड्याच्या बाजारपेठेतही ग्राहक डाळिंबाला मोठ्याप्रमाणावर पसंती देत असतात.शहरातील बाजारपेठेत १५० ते…

Read More

वसंत भोईर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे आमचे ध्येय _सुनीता अग्रवाल वाडा तालुक्याच्या ग्रामीण भागातील शिक्षणाच्या समस्या जाणून सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही शाळांना फक्त भौतिक सुविधा देत नसून या तालुक्यातील दुर्गम, आदिवासी भागात तळागाळातल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी होईल यासाठी सेवा सहयोग फाउंडेशनच्या जोडीने आम्ही विविध स्तरांवर काम करीत असल्याचे मोतीलाल ओसवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनीता अग्रवाल यांनी सांगितले. मोतीलाल ओसवाल फाउंडेशन व सेवा सहयोग फाउंडेशन,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचघर येथील ह.वी. पाटील विद्यालय व कै.घ.बा. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचची नवीन इमारत,नूतनीकरण व स्वच्छतागृह यांचा लोकार्पण सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास सेवा सहयोग फाउंडेशनचे प्रमुख किशोर मोघे,दिपाली देवळे,महर्षी वैष्णव,राम रोकडे,अश्विनी पवार,संदीप पवार…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” देवाभाऊंनी महाराष्ट्राचा बिहार केला….” काल महाराष्ट्राच्या विधिमंडळ आवारात जे काही घडलं ते पाहून प्रत्येक मराठी माणसाची मान शरमेने खाली गेली आहे.आपण महाराष्ट्रात राहतो की बिहार/उत्तर प्रदेशात ? असा प्रश्न आपल्या मनात उभा राहतो.विरोधी पक्षाला नामोहरम करण्यासाठी या देवभाऊनी गेल्या पाच ते सहा वर्षांत जे गुंड पोसले,जे हवशे नवशे गोळा केले.त्यामुळे महाराष्ट्र राज्य आज रसातळाला गेले आहे.देवाभाऊंच्या राज्यात कोणी सुरक्षित नाही.या अशा स्थितीमुळे पुरोगामी राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राचा चेहरा काळवंडला गेला आहे. पवार कुटुंबाच्या विरोधात कायम गरळ ओकणारा आ.गोपीचंद पडळकर याने सध्या कंबरेचे सोडून डोक्याला बांधले आहे.शरद पवार व सुप्रिया पवार यांच्याबाबतीत अश्लाध्य भाषेत टीकाटिप्पणी…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” ” सुप्त पण जीवघेणी स्पर्धा,” येत्या १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करत आहेत.भाजपच्या नियमानुसार त्यांनी सेवानिवृत्त व्हावे,यासाठी दबाव वाढत चालला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत,या दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुप्त संघर्ष सुरू झाला आहे.मोदी व शहा हे दोघेही सध्या संघाचे जोखड झुगारून देशाचा कारभार करत असल्यामुळे संघ व भाजपमध्ये असलेली दरी सतत रुंदावत चालली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र २०२९ मध्ये निवडणूक लढवण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत.संघाला मात्र देशाचे नेतृत्व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवले पाहिजे,असे वाटत आहे.संघाच्या या हालचाली पाहून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी काही महिन्यांपूर्वी…

Read More

सुरेश काटे,तलासरी व्यवसायिक,व्यापारी  व हॉटेल मालक यांची संयुक्त बैठक संपन्न, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत जिल्हा प्लास्टिक मुक्त तसेच राष्ट्रीय महामार्ग सुरक्षितता,स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आले होते. त्यानुसार तलासरी तहसीलदार तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक तलासरी आणि आरटीओ अधिकारी यांचा उपस्थितीत हॉटेल व्यवसायिक,आस्थापना दुकानदार यांची बैठक तलासरीत नुकतीच पार पडली. तलासरी पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी पार पडलेल्या या बैठकीत प्लास्टिक मुक्त रस्ते, करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.प्लास्टिकचा वापर बंद करून सिंगल प्लास्टिक वापरण्यात येऊ नये,यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने प्लास्टिक मुक्त अभियान राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या.तसेच रस्ता सुरक्षिततेसाठी वाहतुक…

Read More

वसंत भोईर,वाडा यांत्रिकी पद्धतीने भातलागवडीकडे वाढला कल. वाडा तालुक्यात जुलैच्या दुस-या आठवड्यापासून सर्वत्र भातलावणीच्या कामाला जोमाने सुरुवात करण्यात आली असून मजुरांच्या कमतरतेमुळे यावेळेस तालुक्यातील शेतकऱ्यांचा यांत्रिकी भात लागवडीकडे कल जास्त असल्याचा दिसत आहे.यात मेहनत,वेळ व खर्चाची मोठी बचत होत आहे. वाड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सर्व तालुक्यांतील गाव-पाड्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे.मात्र एकाचवेळी सर्व तालुक्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरुवात झाल्यानमुळे वाडा तालुक्यात मजुरांची मोठी कमतरता नेहमीच भासत असते.त्यामुळे विक्रमगड,तलासरी,जव्हार, मोखाडा व नाशिक या ठिकाणांहून मजूर आणावे लागतात.त्यात मजुरांचे दरही वाढले आहेत.एका शेतमजुराला दररोज ४५० ते ५०० रू.अधिक सकाळी न्याहरी,दुपारी जेवणही द्यावे लागते.त्यामुळे शेती हा जास्त कष्टाचा आणि खर्चिक व्यवसाय…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे  युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा, जागतिक युवा कौशल्य दिन हा दिवस दरवर्षी १५ जुलै रोजी साजरा केला जातो. तरुणांना २१ व्या शतकातील बदलत्या औद्योगिक व तांत्रिक गरजांशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक कौशल्यांची जाणीव करून देणे, त्यांना सशक्त करणे असा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे.या पार्श्वभूमीवर भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,जव्हार येथे आज हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्राचार्य रोहन चुंबळे यांनी भूषवले.त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य शिक्षणाचे महत्त्व सांगताना बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःला सतत अपडेट ठेवण्याची गरज अधोरेखित केली.कार्यक्रमासाठी जेराई फिटनेसचे प्रतिनिधी संकेत पोलादिया आणि मंगेश शेटे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.तसेच…

Read More