जव्हार प्रतिनिधी,
जिल्ह्यातील २४ शिक्षकांची राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी निवड,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र राज्य,पुणे आणि ” शांतिलाल मुथ्था फाउंडेशन, ” पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मूल्यवर्धन राज्यस्तरीय प्रशिक्षण ३.०’ कार्यक्रम वाघोली, पुणे येथे नुकताच यशस्वीरीत्या पार पडला. या प्रशिक्षणाचा उद्देश राज्यातील शाळांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षणाचा पाया मजबूत करणे हा होता.
या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणामध्ये संचालक राहुल रेखावार ( भा. प्र. से. ), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जैन संघटना,शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संचालक शांतिलाल मुथ्था,कार्यकारी सहसंपादक समता विभाग प्रमुख वर्षाराणी भोपळे, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे प्रमुख मीनल दशपुत्रे,अशोक विद्याधर,गोपाल शुक्ल, मास्टर ट्रेनर बाळासाहेब ठोंबरे, सचिन वालुंजकर, सुहास पाटील, सायली खटावकर, महाराष्ट्रातील शिक्षण विभागांतील निवडक प्रतिनिधिक शिक्षक,प्रशिक्षक व समन्वयक हे सहभागी झाले होते.या प्रशिक्षणात पालघर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून तीन याप्रमाणे एकूण २४ शिक्षक सामील झाले होते.यामध्ये वसई तालुक्यातून स्वाती शिंदे, संगीता राऊत,युवराज इरकर, डहाणू तालुक्यातून रुपाली पाटील, रोहिणी कट्टीमणि, श्रीराम भिसे,जव्हार तालुक्यातून दर्शना मुकणे, राजेंद्र गोपणे,संदीपकुमार भदाने,वाडा तालुक्यातून दीपक शनवार,रतिश भोईर, प्रशांत भोईर,पालघर तालुक्यातून प्राची पाटील, राजेंद्र वडगणे,राजन गरुड, तलासरी तालुक्यातून सिद्धार्थ खंडारे,अमोल वराडे,कृष्णा बहिर,मोखाडा तालुक्यातून सुजितकुमार पडर,अविनाश शिंदे,दत्तात्रय घोडके आणि विक्रमगड तालुक्यातून अजित भोईर,कमलाकर भोईर, धर्मराज पाटील या शिक्षकांचा समावेश होता.हे सर्व शिक्षक पालघर जिल्ह्यांमध्ये तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका बजावतील.प्रशिक्षणात मूल्यवर्धन शिक्षणाची व्यापक संकल्पना,मूल्यांचे वर्गीकरण, मूल्याधिष्ठित अध्यापन कौशल्ये,प्रभावी संवाद, सहअस्तित्व,सहकार्य, जबाबदारी,संवेदनशीलता यांसारख्या मूलगामी मूल्यांवर आधारित क्रियाशील सत्रे आयोजित करण्यात आली होती.सहभागी शिक्षकांनी भूमिका अभिनय,समूहचर्चा, कृतिशील कार्यशाळा, सादरीकरणे व अनुभव कथन यांच्या माध्यमातून मूल्यवर्धन शिक्षणाचे विविध पैलू अनुभवले. ” शांतिलाल मुथ्था फाउंडेशन, ” च्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी उत्कृष्ट सत्रांद्वारे शिक्षकांना मूल्यवर्धन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी प्रेरित केले.या उपक्रमामुळे शिक्षकांमध्ये मूल्यवर्धन अध्यापनाची जाणीवपूर्वकता आणि उत्साह निर्माण झाला आहे.राज्यातील शाळांमध्ये मूल्याधारित शिक्षणाची पायाभरणी करण्याच्या दिशेने हे प्रशिक्षण एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

