सुरेश काटे,तलासरी
व्यवसायिक,व्यापारी व हॉटेल मालक यांची संयुक्त बैठक संपन्न,
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत जिल्हा प्लास्टिक मुक्त तसेच राष्ट्रीय महामार्ग सुरक्षितता,स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आले होते. त्यानुसार तलासरी तहसीलदार तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक तलासरी आणि आरटीओ अधिकारी यांचा उपस्थितीत हॉटेल व्यवसायिक,आस्थापना दुकानदार यांची बैठक तलासरीत नुकतीच पार पडली.
तलासरी पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी पार पडलेल्या या बैठकीत प्लास्टिक मुक्त रस्ते, करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.प्लास्टिकचा वापर बंद करून सिंगल प्लास्टिक वापरण्यात येऊ नये,यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने प्लास्टिक मुक्त अभियान राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या.तसेच रस्ता सुरक्षिततेसाठी वाहतुक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.त्याकरीता सिग्नल,झेब्रा क्रॉसिंग,ट्राफिक लाईट लावणे तसेच वेगमर्यादा,धोकादायक वळणे, हेल्मेट व सीट बेल्ट वापरणे, शाळेजवळ सावधगिरी बाळगणे,वाहन चालवताना मोबाईल फोन न वापरणे, दारू पिऊन वाहन न चालवणे याबाबत उपस्थितांना माहिती देत नियमांचे भंग करणाऱ्यावर कडक कारवाई करणार असल्याची ताकीद देण्यात आली.धाबा किंवा हॉटेलमधून रोज मोठ्या प्रमाणात ओला कचरा आणि सुक्या कचऱ्याचे प्लास्टिक,कागद,पॅकेजिंगचा वापर होत असतो.त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे. कचरा व्यवस्थापन करणं करणे आवश्यक असून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हॉटेल व्यवसायिकानी सहकार्य करावे,अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बैठकीत देण्यात आला. या बैठकीला तहसिलदार अमोल पाठक, पोलिस निरीक्षक अजय गोरड, गटविकास अधिकारी वैभव साफळे,नगराध्यक्ष सुरेश भोये आणि शेकडो हॉटेल व्यवसायिक,दुकानदार, फेरीवाले उपस्थित होते.

