Author: दीपक मोहिते

सचिन पाटील,विरार विरार येथे ” साईक स्पेक्ट्रम २०२५” डिजिटल स्पर्धेचे आयोजन, युवा पिढीच्या मानसशास्त्राचे सखोल आकलन करणे,हे त्यांचे कल्याण आणि सध्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.मानसिक आरोग्य ते डिजिटल,वित्त आणि सामाजिक गतिशीलता यांसारख्या प्रचलित ट्रेंडबद्दल जागरूकता निर्माण केल्यामुळे तरुणांना या विश्वाशी जोडण्यास मदत होते. ” साईक स्पेक्ट्रम २०२५” या आंतरमहाविद्यालयीन डिजिटल स्पर्धेने विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले. विवा महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाने ” साईक स्पेक्ट्रम २०२५” या अभिनव आंतरमहाविद्यालयीन डिजिटल स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.या स्पर्धेप्रसंगी विवा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.दीपा वर्मा,उप प्राचार्या डॉ.प्राजक्ता परांजपे, मानसशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका रश्मी…

Read More

दीपक मोहिते, मुख्यमंत्री फडणवीस  मंत्रीमंडळातील चौघांना बाहेरचा रस्ता दाखवणार ; आ. स्नेहा दुबे पंडीत यांची वर्णी लागणार… राज्य मंत्रीमंडळातील चार मंत्र्यांच्या डोक्यावर सध्या हकालपट्टीची तलवार लटकत आहे.संजय शिरसाठ,माणिकराव कोकाटे,योगेश कदम व संजय राठोड,या चार मंत्र्यांचा त्यामध्ये समावेश आहे.तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याला सध्या राज्यमंत्री नाही,त्यामुळे तीन कॅबिनेट व दोन राज्यमंत्री अशी पाच पदे भरावी लागणार आहेत.त्यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाची फेररचना करतील,अशी शक्यता आहे.या फेररचनेत वसई तालुक्याला राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.त्यासाठी सुशिक्षित व अभ्यासू आमदार अशी ओळख असलेल्या वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांचे नाव आघाडीवर आहे.राज्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.त्यांचे वडील विवेक पंडित…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या राजीनाम्याची कारणे अद्याप गुलदस्त्यातच…. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या अचानक राजीनामा देण्यावरून देशातील राजकारण तापले असून याविषयी होणारी चर्चा शिगेला पोहोचली आहे.या राजीनाम्याच्या मागे कोणती कारणे आहेत,हे शोधणे सत्ताधारी,विरोधक व प्रसिद्धी माध्यमांना देखील शक्य झालेले नाही.त्याची नेमकी कारणे केवळ तीन व्यक्तींनाच माहीत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा व स्वतः जगदीप धनकड होय.या तिघांशिवाय इतर कोणालाही या राजिनाम्यामागची नेमकी काय कारणे आहेत ते माहीत नाही.अवघ्या चार तासात पडद्याआड जे काही घडले,ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना कळू देण्यात आले नाही. माजी उपराष्ट्रपती धनकड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु याना पाठवलेल्या राजीनामा पत्रात प्रकृतीच्या कारणावरून मी…

Read More

वसंत भोईर,वाडा पावणे दोन कोटीचे अमली पदार्थ पोलिसांनी केले हस्तगत, वाडा तालुक्यातील कुडूस येथे राहणाऱ्या मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा हा इसम त्याच्या मारूती कारमधून मुब्रा ठाणे येथे जात असता त्याच्याकडे १ किलो २०० ग्रॅम इतका अंमली पदार्थ सापडले.या घटनेमुळे ग्रामीण भागातही अमली पदार्थाची विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार दिवसापूर्वी मुंब्रा बायपास उड्डाणपूल लगत मुंब्रा येथे गुन्हे शाखा गट 1 ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रचलेल्या सापळ्यामध्ये मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा याच्याकडून सुमारे १ कोटी ६९ लाख रु.किं.चा एमडी हा अंमली पदार्थ सापडला.याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी…

Read More

दीपक मोहिते, वसई पूर्वेस रेंज ऑफिस येथे होणारी वाहतूककोंडी नाहीशी होणार ; आ. तरे यांचे प्रयत्न फळाला आले… पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत बोईसरचे आ.विलास तरे यांनी वसई पूर्वेस रेंज नाका येथे होणाऱ्या वाहतूककोंडीबाबत प्रश्न उपस्थित करत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी आ.तरे यांनी सुचवलेल्या पर्यायावर विचार करून उपाययोजना करू,असे आश्वासन दिले.त्यामुळे या परिसरातील नागरिक तसेच रोजगारानिमित्त येथी औद्योगिक क्षेत्रात दररोज येजा करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.गेली अनेक प्रलंबित असलेला हा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार असल्यामुळे येथील आठ ते दहा गावातील नागरिक आ.विलास तरे यांना धन्यवाद देत आहेत. वसई पूर्वेस असलेल्या…

Read More

सुरेश काटे,तलासरी तलासरी पोलिसांनी गांजा पकडला, दोघांना अटक, तलासरी पोलिसांना तलासरी इभाडपाडा तास्कंद हॉटेल जवळ गांजा विक्रीसाठी दोन इसम येणार आहेत,अशी खबर मिळाली होती. पोलिसांनी इभाडपाडा येथे रविवारी सकाळपासून सापळा रचला होता.दोन इसम मोटार सायकलवरून गांजा विक्रीसाठी आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याजवळ सव्वा दोन किलो गांजा सापडला. याप्रकरणी संतोष दुर्योधन स्वाईन,राहणार तलासरी तसेच बापटीस नवसु धोडी राहणार खेरडी,नगर हवेली या दोघांना अटक केली त्यांच्याकडून ४७ हजार रु. किमतीचा गांजा तसेच २९ हजार रु रोख रक्कम,दोन मोटार सायकली,दोन मोबाईल फोन,असा एकूण रुपये ३ लाख ९४ हजार रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे,…

Read More

वसंत भोईर,वाडा बामण शेत गावात सोयी -सुविधांचा पत्ताच नाही, तालुक्यातील अनेक गाव पाड्यात स्वातंत्र्यानंतरही नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.नांदणी अंबरभुई ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बामण शेत गावातील आदिवासी बांधवांना गावात जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे त्यांना चिखल तुडवत पायवाटेने जावे लागते. पाण्याची समस्या,वीज आहे, परंतु असून नसल्यासारखी. त्यामुळे आम्ही आदिवासींच्या पोटी जन्म घेतला आणि तोही दुर्गम भागात घेतला हा आमचा गुन्हा झाला काय ? असा संतप्त सवाल या गावातील आदिवासींकडून सरकारला विचारण्यात येत आहे. बामण शेत हे गाव घनदाट जंगलात डोंगर माथ्यावर आहे. साधारणपणे ३५ ते ४० घरांची लोकवस्ती असून या गावची लोकसंख्या २०० च्या आसपास आहे. निवडणूकीच्या काळात लोकप्रतिनिधी…

Read More

दीपक मोहिते, नवनिर्वाचित आमदारांचे प्रगती पुस्तक, वसईच्या आ.स्नेहा दुबे – पंडित अव्वल क्रमांकावर… नवनिर्वाचित आमदारांच्या कारकिर्दीला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत.या सहा महिन्यांच्या काळात आमदारांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने किती प्रयत्न केले,याविषयीचा लेखा – जोगा,त्यांना मतदान केलेल्या मतदारांसमोर मांडायला हवा.त्यासाठी हा लेखप्रपंच होय.आपला वसई तालुका वसई, नालासोपारा व बोईसर अशा तीन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे.या तीनही मतदारसंघात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे सारे प्रश्न एकमेकांपासून भिन्न स्वरूपाचे आहेत.मात्र हे सारे प्रश्न येथील मतदारांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत.त्यामुळे आ.स्नेहा दुबे-पंडित,आ.राजन नाईक व आ.विलास तरे,या तिघांच्या एकूण कामकाजाचा आढावा घेणे,क्रमप्राप्त होते.तो आढावा आम्ही नुकताच घेतला.या सर्व्हेक्षणानंतर जे प्रगतीपत्रक…

Read More

दीपक मोहिते, आरोग्य,शिक्षण,मुलभूत व पायाभूत सुविधाची कामे प्राधान्याने पूर्ण करा – पालकमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक लोकशाहिर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे नुकतीच पार पडली. या बैठकीस खा.सुरेश म्हात्रे,आ.ज्ञानेश्वर म्हात्रे,आ.राजेंद्र गावीत,आ.दौलत दरोडा,आ.शांताराम मोरे,आ.विलास तरे आ.विनोद निकोले,आ. हरिश्चंद्र भोये आ.स्नेहा दुबे पंडित,राजन नाईक,तसेच जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड़,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,पोलीस अधिक्षक यतिश देशमुख,डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री,जव्हार प्रकल्प अधिकारी,अपूर्वा बासुर,जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे, आणि जिल्ह्यातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ५ फेब्रु.रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यात…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” लोकप्रतिनिधी म्हणून गांभीर्याने विचार करा… गेल्या रवि. वसई येथे आ. स्नेहा दुबे-पंडीत यांच्या प्रयत्नातून स्वयं पुनर्विकास योजने संदर्भात शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला वसईकर नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.पुनर्विकास म्हणजे नक्की काय व या योजनेचा सर्वासामान्य लोकांना कसा फायदा होतो,या दोन महत्वाच्या विषयावर नागरिकांना अवगत करण्यात आले.त्यामुळे भविष्यात या योजनेचे फायदे सर्वसामान्यजनांना होऊ शकतो.कारण वसई विरार भागातील जमिनीचा विकास पूर्ण होत आला आहे.त्यामुळे बिल्डर लॉबीची नजर जुन्या इमारतीवर पडू लागली आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली अनेक बिल्डर्सनी अनेक गृहनिर्माण संस्थांची घोर फसवणूक केली आहे.ती तशीच सुरु राहता कामा नये, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आ. स्नेहा दुबे-…

Read More