सुरेश काटे,तलासरी
तलासरी पोलिसांनी गांजा पकडला,
दोघांना अटक,
तलासरी पोलिसांना तलासरी इभाडपाडा तास्कंद हॉटेल जवळ गांजा विक्रीसाठी दोन इसम येणार आहेत,अशी खबर मिळाली होती. पोलिसांनी इभाडपाडा येथे रविवारी सकाळपासून सापळा रचला होता.दोन इसम मोटार सायकलवरून गांजा विक्रीसाठी आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याजवळ सव्वा दोन किलो गांजा सापडला. याप्रकरणी संतोष दुर्योधन स्वाईन,राहणार तलासरी तसेच बापटीस नवसु धोडी राहणार खेरडी,नगर हवेली या दोघांना अटक केली त्यांच्याकडून ४७ हजार रु. किमतीचा गांजा तसेच २९ हजार रु रोख रक्कम,दोन मोटार सायकली,दोन मोबाईल फोन,असा एकूण रुपये ३ लाख ९४ हजार रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे, पोलीस निरीक्षक अजय गोरड, तसेच तलासरी पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यानी केली.

