वसंत भोईर,वाडा
पावणे दोन कोटीचे अमली पदार्थ पोलिसांनी केले हस्तगत,
वाडा तालुक्यातील कुडूस येथे राहणाऱ्या मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा हा इसम त्याच्या मारूती कारमधून मुब्रा ठाणे येथे जात असता त्याच्याकडे १ किलो २०० ग्रॅम इतका अंमली पदार्थ सापडले.या घटनेमुळे ग्रामीण भागातही अमली पदार्थाची विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार दिवसापूर्वी मुंब्रा बायपास उड्डाणपूल लगत मुंब्रा येथे गुन्हे शाखा गट 1 ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रचलेल्या सापळ्यामध्ये मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा याच्याकडून सुमारे १ कोटी ६९ लाख रु.किं.चा एमडी हा अंमली पदार्थ सापडला.याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात
गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपी हा कुडूस येथील प्रगतीनगर मध्ये राहणारा असून त्याचे कुडूस नाका येथे औषधांचे दुकान आहे.त्याला ठाणे पोलीसांना ताब्यात घेतले असून सदरचा माल कोठून व कसा आणला,याबाबत तपास सुरू आहे.दरम्यान,वाडा तालुक्याच्या ग्रामीण भागातही आता एमडी पदार्थाची विक्री होत असल्याचे उघडकीस आले असून वाडा पोलीस मात्र याबाबत अनभिज्ञ आहेत.

