- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदाचा पाऊस भातशेतीला दिलासा देणारा….
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा मुसारणे गावात वृक्षारोपण कार्यक्रम, गाला प्रिसीजन इंजिनिअरिंग कंपनीतर्फे वाडा तालुक्यातील मुसारणे गावात वृक्षारोपणाचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत फळझाडांसह पर्यावरणास लाभदायक अशा ऑक्सिजन देणाऱ्या विविध वृक्षप्रजातींचा समावेश होता. पडीक जमिनीवर वृक्षारोपण करून हिरवळीत रूपांतर करत असतात. त्यानुसार एक सुंदर वनराई उभारण्याचा मानस असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी तुकाराम बेहेरे यांनी दिली.हे वृक्ष केवळ सौंदर्यवृद्धी न करता पर्यावरण संतुलन राखण्यासही मोलाचे ठरणार आहेत.स्थानिक पातळीवर समाजहिताचे कार्य करणे, अशी आमची जबाबदारी आहे.असे बेहेरे यांनी सांगितले. यावेळी कंपनीतर्फे अवधूत पणशीकर,योगिता भोर,राजेंद्र मोरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते पराग पाटील उपस्थित होते.स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम नियमित राबवावेत,अशी अपेक्षा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” लाडकी बहीण,” योजनेमुळे ” आनंदाचा शिधा,” योजना होणार इतिहासजमा… आपले राज्य सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे.लाडकी बहीण योजनेतील लाभ घेतलेल्या तब्बल २६ लाख महिला या योजनेच्या बोगस लाभार्थी असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यामागे लवकरच चौकशीचा ससेमिरा लागणार आहे.या योजनेवर आजवर झालेल्या प्रचंड खर्चामुळे अनेक विभागाची राज्यातील अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत,तर ठेकेदारांची हजारो कोटी रु.देयके थकली आहेत. राज्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत असून यंदाच्या गणेशोत्सवात जनतेला ” ” आनंदाचा शिधा,” ही मिळणार नाही.लाडकी बहीण योजनेसाठी ४५ हजार कोटी रु.द्यावे लागणार असल्यामुळे आनंदाच्या शिधावर विरजण पडले आहे.दरवर्षी सणासुदीच्या काळात राज्यातील गरीब जनतेला केवळ शंभर रु.मध्ये…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” पालघर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता जि.प.व आठ प.स.वर महायुतीचेच वर्चस्व राहणार आहे… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या एकूण तीन टप्यात होणार असल्याचे निवडणूक आयोगातर्फे नुकतेच स्पष्ट करण्यात आले आहे.पहिल्या टप्यात जिल्हा परिषदा / पंचायत समित्या,दुसऱ्या टप्यात नगरपरिषदा / नगर पंचायती व तिसऱ्या टप्यात महानरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत.पहिल्या टप्यात जिल्हा परिषदेच्या ५७ व आठ पंचायत समित्याच्या एकूण ११४ जागासाठी सर्वप्रथम निवडणुका होतील.विसर्जित जिल्हा परिषदेत भाजप – सेना ( शिंदे गट ) महायुतीचे वर्चस्व होते.आगामी निवडणुकीतही त्यांचेच वर्चस्व राहील,असा अंदाज आहे. जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीच्या तालूकानिहाय जागा… १ ) पालघर तालुका – जिल्हा परिषद…
दीपक मोहिते, स्वातंत्र्याची दुसरी लढण्यासाठी पत्रकारांनी तयारी ठेवावी…. पत्रकारीताहा लोकशाही व्यवस्थेत चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो.गेली अनेक वर्षे या विषयावर खुप काही बोलले व लिहिले गेले.पत्रकारिता हा समाजमनाचा आरसा असतो व समाजामध्ये घडणाऱ्या चांगल्या व वाईट घडामोडीचे प्रतिबिंब,या आरशात उमटत असते.पण हल्ली या आरशाला तडे पडू लागले आहेत.एकेकाळी आदर्श पत्रकारिता म्हणून ओळख असलेले हे माध्यम आता ” गोदी मिडिया,” म्हणून नावारूपाला आले आहे.बदलत्या काळानुसार पत्रकारानीही आपली चौकट पार बदलून टाकली आहे.वृत्तवाहिनी व वृत्तपत्र समुहाच्या मालकानी आपल्या उद्योगाला अर्थकारणाची जोड देण्यास सुरुवात केल्यानंतर पत्रकार देखील बेफाम होत गेले.पत्रकारांचे लगाम मालकाच्या हातून राजकारण्याच्या हाती कधी गेले ते कळले देखील नाही.आता काळाच्या ओघात…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” राहुल गांधी व प्रियंका गांधी या दोघा भावंडानी मोदी – शहा यांची सध्या झोप उडवली आहे… ज्या राहुल गांधी यांना गेली दहा वर्षे मोदी – शहा व त्यांच्या टोळीने ” पप्पू,” सतत हिणवले,त्या राहुल गांधी यांनी त्यांना सध्या सळो की पळो करून सोडले आहे.अनेक प्रकरणात केंद्र सरकारला राहुल गांधी यांच्यामुळे माघार घ्यावी लागली आहे.काल राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जो काही पराभव झाला तो निवडणूक आयोगाच्या कुटील कारस्थानामुळे झाल्याचे पत्रकार परिषदेत माध्यमांच्या निदर्शनास आणून दिले.महाराष्ट्र व हरयाणा राज्यात भाजपचा झालेला विजय न्यायाला धरून नव्हता,हे सिद्ध करण्यात राहुल गांधी यशस्वी ठरले आहेत.त्यांच्या आक्रमकतेसमोर मोदी – शहा,अक्षरशः…
वसंत भोईर,वाडा मनसतर्फे कारवाई करण्याची मागणी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय क्रिंदे यांना वाडा तालुक्यात होत असलेल्या अमली पदार्थ विक्री विरोधात निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. या सर्व गैरधंद्यात तरुणाई, कॉलेजचे विद्यार्थी व्यसनाच्या आहारी चालले आहेत.या प्रकारामुळे कुटुंबे उध्वस्त होत आहेत .तरुणाईला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलीस निरीक्षक वाडा यांच्याकडे कारवाई संदर्भात मागणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थी सेनेचे पालघर उपजिल्हाध्यक्ष निखिल बागुल, उपतालुकाध्यक्ष चेतन गोरे, संघटक विशाल गोळे, विभागाध्यक्ष भावेश बागुल आदींसह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
दीपक मोहिते, ” भयावह वास्तव,” …तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकतील, गेल्या तीन दशकात राज्यात सुमारे १ कोटी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.या सर्व आत्महत्या या विदर्भ व मराठवाड्यात झाल्या.यावर्षी २१ लाख शेतकऱ्यांचे ३२ हजार कोटी रु.च्या कर्जाची थकबाकी आहे.त्याच्या वसुलीसाठी बँकाचा तगादा सुरू झाला आहे.राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही,असे स्पष्ट केल्यामुळे उर्वरित सहा महिन्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल,अशी भिती विदर्भ व मराठवाड्यात व्यक्त करण्यात येत आहे. ” शेतकऱ्यांच्या आत्महत्या,” या संवेदनशील विषयाकडे आजवर एकाही सरकारने गांभीर्याने पाहिले नाही.केवळ तात्पुरती मलमपट्टी करणे,यावर या सर्व सरकारने भर दिला.कर्जमाफी करण्याचे त्यांचे आश्वासन हे निवडणुकीचा जुमला होता व आजही तशीच स्थिती…
दीपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” भाजप चांगलाच सक्रिय ; अनेक नाराज गळाला लागण्याची शक्यता… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येत्या चार महिन्यात लागण्याची शक्यता गृहीत धरून भाजपची यंत्रणा आता सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजप आता वसई विरार महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्याच्या तयारीत आहेत. दोन दिवसापूर्वी झालेल्या घाऊक इनकमिंगमुळे भाजप चांगलाच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.शिवसेनेचे पंकज देशमुख व किशोर पाटील हे दोघे पूर्वाश्रमीचे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते होते.लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेमध्ये ( उबाठा ) प्रवेश केला.पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानी त्यांना पक्षात आल्या आल्या जिल्हाप्रमुखपद दिले.त्यामुळे पक्षात प्रचंड नाराजी निर्माण झाली व त्यांना विरोध होण्यास सुरुवात झाली.सेनेचे नवघर-…
सुरेश वैद्य,पालघर सोहम घरत ” मिस्टर मुंबई युनिव्हर्सिटी २०२४-२५, ” तर श्रेया गायकवाड ” मिस मुंबई युनिव्हर्सिटी,” सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी सोहम कल्पेश घरत याने मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात ” मिस्टर युनिव्हर्सिटी २०२४-२५,” हा मानाचा किताब पटकावून संपूर्ण महाविद्यालयाचा, संस्थेचा आणि विभागाचा गौरव उंचावला आहे.विशेष म्हणजे,” मिस युनिव्हर्सिटी,” या स्पर्धेतही महाविद्यालयाच्या कु.श्रेया गायकवाड हिला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. मुंबई विद्यापीठाच्या या वार्षिक युवा महोत्सवात विविध सांस्कृतिक कला, व्यक्तिमत्त्व आणि सादरीकरण आधारित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास ३५० महाविद्यालयांमधून हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.त्यामध्ये सोहम घरत याने ” जॅकपॉट इव्हेंट, ” मध्ये आपला ठसा उमटवत ” मिस्टर…
दीपक मोहिते, ” निवडणुक रणसंग्राम,” बविआ व शिवसेना ( उबाठा ), गटात प्रचंड अस्वस्थता… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने स्पष्ट संकेत दिले असून या निवडणुका डिसें.किंवा जाने.महिन्यात होण्याची शक्यता आहे.या निवडणुका तीन टप्यात होणार असून त्या दृष्टीने निवडणूक आयोग कामाला लागले आहे.महत्वाचा विषय म्हणजे प्रभाग रचनेचा तिढा नुकताच सुटला असून विद्यमान सरकारने प्रस्तावित केलेल्या प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रभाग ११ ने वाढण्याची शक्यता आहे.गेल्या निवडणुकीत एकूण ११५ जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या,त्यामध्ये आता नव्याने ११ जागा वाढणार आहेत.यंदा एकूण १२६ जागावर निवडणुका होणार आहेत.गेल्या निवडणुकीत बविआ – १०८,शिवसेना – ०५,भाजप -०१,मनसे -०१,…
