वसंत भोईर,वाडा
मुसारणे गावात वृक्षारोपण कार्यक्रम,
गाला प्रिसीजन इंजिनिअरिंग कंपनीतर्फे वाडा तालुक्यातील मुसारणे गावात वृक्षारोपणाचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत फळझाडांसह पर्यावरणास लाभदायक अशा ऑक्सिजन देणाऱ्या विविध वृक्षप्रजातींचा समावेश होता.
पडीक जमिनीवर वृक्षारोपण करून हिरवळीत रूपांतर करत असतात. त्यानुसार एक सुंदर वनराई उभारण्याचा मानस असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी तुकाराम बेहेरे यांनी दिली.हे वृक्ष केवळ सौंदर्यवृद्धी न करता पर्यावरण संतुलन राखण्यासही मोलाचे ठरणार आहेत.स्थानिक पातळीवर समाजहिताचे कार्य करणे, अशी आमची जबाबदारी आहे.असे बेहेरे यांनी सांगितले.
यावेळी कंपनीतर्फे अवधूत पणशीकर,योगिता भोर,राजेंद्र मोरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते पराग पाटील उपस्थित होते.स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम नियमित राबवावेत,अशी अपेक्षा व्यक्त केली.

